प्रबोधन पदयात्रेचे विनोद बोराडे मित्रमंडळाकडून स्वागत; सेलूमध्ये कार्यक्रम
सेलू जि.परभणी : सर्वज्ञ प्रतिष्ठानद्वारा आयोजित चतुर्विध साधन वंदन व समाज प्रबोधन पदयात्रेचे रविवारी सेलू् शहरात आगमन झाले होते. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्र मंडळातर्फे पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने श्री साईबाबा मंदिरातील सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, पदयात्रा संयोजक हंसराज दादाजी खामणीकर, साधीराज दादाजी कविश्वर, नांदेडकर बाबाजी, भोजराज दादाजी अमृते आदींची प्रमुख उपस्थिती होती. दिंडीतील सुमारे एक हजार महिला व पुरुषांच्या भोजन प्रसाद देण्यात आला. राजेंद्र पवार, अमर सुरवसे भोजने बाबाजी, दत्तराज दादा भोजने यांच्यासह सेलू येथील महानुभाव संप्रदायाची मोठी उपस्थिती होती.