सेलू,जिंतूरमध्ये ४४५ कोटींची विकासकामे मंजूर : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलू,जिंतूरमध्ये ४४५ कोटींची विकासकामे मंजूर : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलू शहरामध्ये चौपदरीकरणासह, पथदिवे, दोन्ही बाजूने ड्रेनेज, वाकिंग ट्रॅकसह संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह सात मीटरचा सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. तसेच इतर कामासाठी एकूण ४४५ कोटी रुपयांची मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये परतूर-सेलू–कोल्हा-वालूर-चारठाणा राज्यमार्ग २५३ वरील किलोमीटर १३ ते ५७ रस्त्याची सुधारण्यासाठी तब्बल ३५५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. राज्यमार्ग २४८ ते इटोली-पोखर्णी- चिंचोली दराडे – वसा आसेगाव रस्ता चार कोटी रुपये, पाथरी-सेलू -देवगाव-रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलासाठी ३९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आमदार मेघना-साकोरे बोर्डीकर यांनी ही माहिती दिली.

परभणी : जिंतूर, सेलू विधानसभा मतदारसंघासाठी आशियाई विकास बँकेकडून तब्बल ३५५ कोटी रुपयांसह रस्ते, पूल, सेलू येथील रेल्वे उड्डाणपूल आदी विविध विकासकामांना एकूण ४४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने सेलू येथील पाथरी रेल्वे गेटवरील उड्डाणपुलासह परतूर-सेलू-कोल्हा- वालूर-चारठाणा या रस्त्याचा समावेश आहे. आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून आमदार बोर्डीकर यांना मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यामध्ये यश मिळाले. यामध्ये परतूर-सेलू-कोल्हा-वालूर-चारठाणा या रस्त्यासाठी तब्बल ३५५ कोटी रुपये आशियाई विकास बँकेमार्फत मंजूर करण्यात आले आहेत. या अंतर्गत सेलू शहरामध्ये चौपदरीकरणासह, पथदिवे, दोन्ही बाजूने ड्रेनेज, वाकिंग ट्रॅकसह संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह सात मीटरचा सिमेंट काँक्रीटचा करण्यात येणार आहे. तसेच इतर कामासाठी एकूण ४४५ कोटी रुपयांची मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये परतूर-सेलू–कोल्हा-वालूर-चारठाणा राज्यमार्ग २५३ वरील किलोमीटर १३ ते ५७ रस्त्याची सुधारण्यासाठी तब्बल ३५५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. राज्यमार्ग २४८ ते इटोली-पोखर्णी- चिंचोली दराडे – वसा आसेगाव रस्ता चार कोटी रुपये, पाथरी-सेलू -देवगाव-रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलासाठी ३९ कोटी रुपये, जिंतूर आणि सेलू तालुक्यातील ८ मंडळ कार्यालये आणि ४० तलाठी कार्यालय बांधकामासाठी ७ कोटी २५ लाख रुपये, राज्य मार्ग २५३ पासून ढेंगळी पिंपळगाव- झोडगाव – तिडी पिंपळगाव- गुगळी धामणगाव राज्य मार्ग २२१ देऊळगाव गात-डासाळा ते जिल्हा सरहद रस्ता पुलाचे बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये, रामा-२५३ पासून ढेंगळी पिंपळगाव – झोडगाव – पिंपळगाव गुगळी धामणगाव रामा-२२१ देऊळगाव गात डासाळा ते जिल्हा सरहद रस्ता रामा-४३२ पुलासाठी‌ १ कोटी ८० लाख, कानडपाटी- सिमनगाव-पिंपळगाव गायके- कुंभारी- जवळा झरी ते दुधगाव-आसेगाव-चिंचोली रस्ता ७ कोटी रुपये, भुसकवडी जोड रस्त्यासाठी ३ कोटी ५० लाख, रामा-२२१ ते मोरेगाव हातनूर-वालूर- कौसडी-बोरी रस्त्यासह मोठया पुलाचे पोचमार्गासह बांधकामासाठी ६ कोटी ५० लाख रुपये, गुळखंड ते वालूर रस्ता सुधारण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये, जोडरस्ता डिग्रस जहांगीर ते रामा-२५३ रस्त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये, चिंतनरवाडी पुलासाठी १ कोटी ४० लाख, भिलज रस्त्याची सुधारणा १ कोटी ४० लाख रुपये, रिडज भोगाव रस्ता २ कोटी ८० लाख रुपये, वस्सा – कसर २ कोटी ८० लाख रुपये, आरसड जोडरस्ता १ कोटी ४० लाख रुपये, शिराळा रस्ता १ कोटी ४९ लाख रुपये, लाडनांद्रा किन्होळा रस्त्याची सुधारणा २ कोटी ८० लाख रुपये, शेक रस्ता १ कोटी ५ लाख लाख, मानमोडी जोडरस्ता ७० लाख रुपये, बेलखेडा ते पिप्राळा १ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!