Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या सभेची सेलूमध्ये तयारी ; पदयात्रेद्वारे मराठा आरक्षणाचा जागर
नूतन महाविद्यालय मैदानावर सभेची तयारी, पार्किंगसाठी शेतमळे, शहराबाहेरील मैदाने
सेलू येथील नूतन महाविद्यालय मैदानावर याआधी १९९० व १९९५ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन वेळा जाहीर सभा झाल्या आहेत. त्यानंतर एकाही पुढार्याने या ठिकाणी सभा घेण्याची हिंमत दाखवली नाही. दरम्यान, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा १६ किंवा १८ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. मैदानावर साफसफाई पूर्ण होत आली आहे. शनिवारपासून मुख्य मंचाचे काम सुरू केले जात आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आजुबाजुच्या मोकळ्या जागा, रस्ते व मैदाने देखील स्वच्छ केले जात आहेत.अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
सेलू जि.परभणी : आरक्षणासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने एक डिसेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सेलू येथे होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी पदयात्रेद्वारे मराठा आरक्षणाचा जागर घालून सभेची वातावरण निर्मिती केली जात आहे.
नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. सेलू्तील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण सुरू आहे. ग्रामीण भागातील सकल मराठा समाज बांधवांचा यामध्ये मोठा सहभाग आहे. दररोज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून शहरात पदयात्रा काढली जात आहे. महिला, शाळकरी विद्यार्थी यांचाही यामध्ये सहभाग आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तो पर्यंत हा लढा सुरू राहणार आहे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतला. यासाठी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकवटलेला आहे. एक डिसेंबरपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणात मोरेगाव, सोनवटी, खादगाव, ब्रह्मवाकडी आदींंसह ४० गावातील मराठा बांधव सहभागी झाले होते. शुक्रवारी रवळगाव, गोहेगाव, शिंदे टाकळी, माळे टाकळी येथील बांधवांनी पदयात्रेत व साखळी उपोषणात सहभाग नोंदविला. पदयात्रेत भगवे झेंडे हाती घेऊन तसेच ” मराठा एकजुटीचा विजय असो, लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा” अशा आशयाचे फलक घेऊन घोषणा करीत आरक्षणाचा जागर घातला जात आहे.
बाळासाहेबांनंतर मनोज जरांगेंचीच पहिली सभा
सेलू येथील नूतन महाविद्यालय मैदानावर याआधी १९९० व १९९५ मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दोन वेळा जाहीर सभा झाल्या आहेत. त्यानंतर एकाही पुढार्याने या ठिकाणी सभा घेण्याची हिंमत दाखवली नाही. दरम्यान, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा १६ किंवा १८ डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली. मैदानावर साफसफाई पूर्ण होत आली आहे. शनिवारपासून मुख्य मंचाचे काम सुरू केले जात आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आजुबाजुच्या मोकळ्या जागा, रस्ते व मैदाने देखील स्वच्छ केले जात आहेत.
पार्किंगसाठी शेतमळे, शहराबाहेरील मैदाने
मनोज जरांगे यांच्या सभेसाठी येणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन, परभणीरोडवर शेरे यांचा शेतमळा, मंठा रोडवरील मणियार यांचे ले आऊट, परतूर-सातोना रोडवर श्रीनिवास आष्टीकर यांचा अशोक नगर परिसर, पुनर्वसन वसाहतीचा परिसर, तर पाथरी रोडने येणाऱ्या वाहतुकीसाठी बोर्डीकर मैदान, मंत्री नगर ले आऊटचा परिसर पार्किंगची व्यवस्था असणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
सेलू,जिंतूरमध्ये ४४५ कोटींची विकासकामे मंजूर : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर