Science Exhibition : रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल प्रथम; सेलू तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
श्रीराम प्रतिष्ठानची चमकदार कामगिरी
सेलू जि.परभणी : जिल्हा परिषद परभणीच्या वतीने शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी आयोजित सेलू तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल, प्रॉस्पपरस पब्लिक स्कूल व ज्ञानतीर्थ विद्यालयाची चमकदार कामगिरी केली आहे.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बाहेती बियाणी नूतन इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात एकूण ४० विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले होते. सेलू तालुक्यातून शाळेतील प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटात प्रिन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी अजित शरद झाडे (वर्ग सातवा) याने सादर केलेल्या प्रयोगाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झालेली आहे. या विद्यार्थ्याने antislip ड्रायव्हर सेक्युरिटी गॉगल हा प्रयोग सादर केला. रात्रीच्या वेळी वाहन चालक गाडी चालवताना अचानक झोप लागल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अपघात होऊ नये म्हणून हा प्रयोग करण्यात आला. हा गॉगल वापरल्यास अपघात टळू शकतात. या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. प्रिन्स अकॅडमीचा आरुष कावळे (वर्ग सातवा) या विद्यार्थ्यांनी अंध लोकांसाठी ‘थर्ड आय कॅप’ नावाचा प्रयोग सादर करून अंध व्यक्तींना दिव्य दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. याप्रयोगाचा द्वितीय क्रमांक आला. तर माध्यमिक गटात साहिल विलास राठोड (वर्ग नववा) याने गॅस गळती थांबविण्यासाठी ऑर्डिनो प्रोग्रामिंग वापरून प्रयोग सादर केला. या प्रयोगाला द्वितीय क्रमांक मिळाला . तसेच शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटामध्ये शिक्षक नारायण चौरे यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक साहित्याला प्रथम क्रमांक मिळाला. यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके आदींसह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.