फुलला आनंद : गरजूंना अन्नदान, वस्त्रदानाचे कीट्स ; सेलूतील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा उपक्रम
विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्थांकडूनप्राप्त कपडे साड्या व इतर साहित्य, उपलब्ध करून झालेले अन्नदानाचे कीटस् शहरातील विविध भागातील गरजूंना वाटप करण्यात आले. यावेळी गरजूंच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव खुलले.
सेलू जि.परभणी : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व शांतिदूत परिवार पुणे यांच्या पुढाकाराने सेलू शहर व परिसरात ‘माणुसकीचे प्रवेशद्वार व एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत शहरातील गोरगरीब व गरजूंना मोफत वस्त्र व अन्नदानाचे कीट वाटप करण्यात आली. रविवारी, दहा डिसेंबररोजी उपक्रमाच्या संयोजकांनी शहरातील विविध परिसरात गरजूपर्यंत पोहोचून वस्तूंच्या कीटस् वितररित केल्या. साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संचालक सुभाष चव्हाण यांच्याकडून प्राप्त कपडे साड्या व इतर साहित्य, पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी रघुनाथ देशमुख यांनी उपलब्ध करून झालेले अन्नदानाचे कीट गरजूंना वाटप करण्यात आले. त्यावेळी गरजूंच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव खुलले. सेलू पोलीस स्टेशन, नगरपरिषद. रेल्वे स्टेशन रोड. अत्रेनदर आदी परिसरात हा कार्यक्रम झाला. या वेळी सेलू नगर परिषदेचे सेवानिवृत्त प्रमुख लेखापाल अशोक कासार, सामाजिक कार्यकर्ते पंडितराव सोळंके गिरगावकर, श्रीकांत कुलकर्णी, सोमेश्वर मिरगे फैजुद्दीन, शांतिदूत परिवारचे डी.व्ही.मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.