Sports : टेनिस व्हॉलीबॉलच्या खेळाडूंना किटचे वाटप; सेलूतील नूतन विद्यालयात शुभेच्छा कार्यक्रम
डोंबिवली येथील राज्य मिनी व युथ टेनिस व्हॉलीबॉल परभणी जिल्हा संघ रवाना
सेलू जि.परभणी : टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व ठाणे जिल्हा टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने २५ वी राज्य मिनी व युथ टेनिसव्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा १५ ते १७ डिसेंबर २०२३ दरम्यान संपन्न होत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परभणी जिल्ह्याचे संघ रवाना झाले आहेत. नूतन विद्यालयात खेळाडूंना शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी परभणी जिल्हा सचिव सतीश नावाडे यांच्यावतीने खेळाडूंना मोफत किटचे वाटप करण्यात आले. या वेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया,सचिव डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, रोहीदास मोगल, सुखानंद बेंडसुरे, डी.डी.सोन्नेकर, राज्य सचिव गणेश माळवे, बी.डी.घोगरे, प्रा.गंगाधर खळगे, नारायण इक्कर, भालचंद्र गाजापुरकर, अंनत विश्वभंर, जुलाह खुदुस, किरण घोलप आदींची उपस्थिती होती.
मिनी मुली : श्रेया उपासे,अनुरा सावजी,अकिता शिंदे, कार्तिकी गोरे, दुर्गा अर्जुने, गायत्री गायके, प्रणाली मुळे ,
मिनी मुले : श्रीराम सवने, आनंद धापसे, कुणाल वावळे, ओम धापसे, अर्थव गायके, अभिषेक शाजले, रितेश मुकाडे, अभिषेक नहायगर, अंबादास बरगे, प्रशिक्षक : नीलेश माळवे, संघ व्यवस्थापक : संतोष शिंदे, युथ मुली : साक्षी गोसावी, राधिका चिलगर, ऋतुजा राऊत, गीता महागडे, वैशाली किखल्ले, वैशाली घोटेकर, शिवकन्या काळे, युथ मुले : सार्थक माळकर, कृष्णा केसरखाने, प्रसाद महाले, सोमनाथ पोपळे, आर्यन गायके, अभिषेक साळवे, कुणाल टाक, प्रशिक्षक : सतीश नावाडे.