Cotton Market : सेलू्तील पहिल्या खासगी बाजार समितीचा शुभारंभ ; कापसाला मिळाला ७२०० रुपयांचा भाव
सेलू जि.परभणी : कापूस बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेलूतील पहिल्या महेश खासगी बाजार समितीचा शुक्रवारी (१५ डिसेंबर) शुभारंभ झाला. या वेळी लिलाव पद्धतीने कापसाला प्रतिक्विंटल ७२०० रुपयांचा भाव मिळाला.
रवळगाव रोडवरील महेश ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये विपिन सीतारामजी मंत्री यांनी ही खाजगी बाजार समिती सुरू केली आहे. शुभारंभप्रसंगी
उद्योजक जयप्रकाश बिहणी, अशोक मंत्री, रामेश्वर राठी, शैलेश तोषणीवाल, नीलेश बिनायके, गोपळजी काबरा, नभाराम पोवार, निर्मलकुमार, अभिषेक तायल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी शेतकरी शेख दीलावर, रायभान बरकुले,भानुदास रासवे, दत्तराव जाधव, गुलाबराव पौळ, सुदर्शन ताठे आदी शेतकऱ्यांना कापूस विक्रीचा मान देण्यात आला. कमाल ७३१५ रुपये, किमान ६९०० रूपये, तर सरासरी ७२०० रुपये भाव बीट पुकारून देण्यात आला. शेतकऱ्यांनी सकाळी ९.३० वाजता वाहने महेश खाजगी बाजार समितीच्या आवारात लावावीत, असे आवाहन सचिव महेश खाजगी बाजार समितीच्या सचिव शाम चौधरी यांनी केले आहे.