Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषात

Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषात

ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत, मान्यवरांची उपस्थिती

Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषातमामा आनंद व मंजुनाथ, आजी, आजोबा यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणांना आई, वडिलांनी सतत प्रोत्साहन दिले. वेळोवेळी शिक्षकांचे आणि मित्रांचे योग्य मार्गदर्शन लाभले. आता देशसेवेसाठी उत्तमोत्तम कार्य करायचे आहे. – लेफ्टनंट संगमेश मलवडे, सेलू् जि.परभणी

सेलू जि.परभणी : वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी सेलू येथील संगमेश शिवानी कैलास मलवडे भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी) लेफ्टनंटपदी दाखल झाले. शुक्रवारी, १५ डिसेंबररोजी समस्त सेलूकरांच्या वतीने संगमेशची ढोल ताशांच्या निनादात आनंदोत्सव मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून मान्यवरांसह नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सेलू शहरातून एनडीएद्वारे थेट लेफ्टनंटपदी दाखल होण्याचा मान संगमेशला मिळाला आहे.

Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषात
सेलू रेल्वे स्थानकावर आई शिवानी, वडील कैलास आणि संगमेश यांचे संजिवनी हुगे, सान्वी हेलसकर, सई कुलकर्णी यांनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी संगमेशचा विशेष सत्कार केला. प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, कॅप्टन जे.पी.शर्मा, रमेश काकडे, विठ्ठलसिंग ठाकूर, गटकळ करिअर ॲकडमीचे रामेश्वर गटकळ, प्रा.के.डी.वाघमारे, प्रशांत माणकेश्वर, आनंद बाहेती, माणिक डख यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, पवन आडळकर, रामराव लाडाणे, ॲड.भगवानराव शिरसाट, अशोक अंभोरे यांनी सत्कार केला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम लोया, सचिव डॉ.विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती आदींची उपस्थिती होती.

Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषात

संगमेशचे आई वडील शिक्षक आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षण छत्रपती संभाजीनगरच्या सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्थेत राहून पूर्ण केले. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनंतर डेहराडून आयएमएमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ९ डिसेंबर रोजी संगमेशची लेफ्टनंटपदी निवड झाली.

Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषात

मिरवणुकीदरम्यान महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. माजी सभापती अशोक काकडे, मनीष कदम, श्री केशवराव बाबासाहेब विद्यालयाचे सचिव महेश खारकर, जयंत दिग्रसकर, वीरशैव लिंगायत समाज, शिवा संघटनेचे शिवकुमार नावाडे, निजलिंग तरवडगे यांनी सत्कार केला. लहानपणापासूनच संगमेशने सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. खडतर कष्टाने पूर्णत्वास गेले आहे, अशा भावना वडील कैलास व आई शिवानी यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. मिरवणुकीत गटकळ करिअर ॲकडमीचे विद्यार्थी, आजी माजी सैनिक, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था पदाधिकारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर राऊत, डॉ.अनिल शेळके, शशिकांत देशपांडे, भालचंद्र गांजापूकर,एकनाथ जाधव, शिवाजी शिंदे, अशोक लिंबेकर, बन्सीधर पद्मावत, अनिल रत्नपारखी, सुभाष मोहकरे, उल्हास पांडे, बाबासाहेब हेलसकर, मनोज कांदळे, अशोक मलवडे, विलास मलवडे, विश्वनाथ हुगे, बालासाहेब क्षीरसागर आदीसह मित्रमंडळाने परिश्रम घेतले.


Indian Military Army : सेलूचा संगमेश बावीसाव्या वर्षी लेफ्टनंट; आनंदोत्सव जल्लोषात

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!