लेफ्टनंट संगमेशचा रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार

लेफ्टनंट संगमेशचा रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलतर्फे सत्कार

भारतीय सैनिकांनी जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेतला आहे. अत्यंत जागरूकपणे जवान सीमेचे रक्षण करतात. ही एक उच्च कोटीची देशसेवा आहे. देशसेवा हीच ईश्वरसेवा आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना जागृत करण्याचे संस्कार ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ संजय रोडगे यांनी केले.

सेलू जि.परभणी : श्रीराम प्रतिष्ठान संचलित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी लेफ्टनंट संगमेश कैलास मलवडे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी सेलू रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात केला.सेलू येथील नूतन कन्या शाळेतील शिक्षक कैलास मलवडे यांचा मुलगा संगमेश मलवडे याने एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले असून, तो सैन्य दलात लेफ्टनंट अधिकारी झाला आहे. त्याच्या या कामगिरीने एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल व सेलू तालुक्याची मान देशात उंचावली आहे. सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करणे ही तालुक्याची परंपरा आहे. आजपर्यंत हजारो युवक सैन्य दलात सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. हीच परंपरा संगमेश याने कमी वयात सैन्य दलात लेफ्टनंटपदी अधिकारी होऊन कायम ठेवली आहे.
संगमेश याचे प्राथमिक शिक्षण श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे झाले आहे. देशसेवेची प्रेरणा प्राथमिक शिक्षणातूनच मिळाली यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना योग्य ते संस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे व शाळेतील मार्गदर्शक शिक्षक शाळेतच करत असतात, असे मत सत्कार प्रसंगी लेफ्टनंट संगमेश मलवडे याने व्यक्त केले. लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगले होते.असे मत संगमेश च्या वडिलांनी व्यक्त केले.आपला मुलगा सैन्य दलात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा अशी त्यांची इच्छा होती, ती इच्छा संगमेश ने खडतर कष्ट घेत पूर्ण केली. सत्कार कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ संजय रोडगे,सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे,  प्राचार्य कार्तिक रत्नाला, घटक संस्थेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!