श्री पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापनेनिमित्त सेलूत आज भव्य शोभा यात्रा; माधवानंद महाराजांची उपस्थिती

श्री पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापनेनिमित्त सेलूत आज भव्य शोभा यात्रा; माधवानंद महाराजांची उपस्थिती

उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन

 

श्री केशवराज बाबासाहेब मंदिरापासून दुपारी चार वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. लोकमान्य टिळक पुतळा, क्रांतीचौक, नूतन रोड, अपूर्वा हॉस्पिटल, विद्यानगर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विद्यानगर श्री हनुमान मंदिर, बाबासाहेब रोड पूल, सरस्वती शिक्षक कॉलनी मार्गाने श्री रेणुका मंगल कार्यालयात समारोप होणार आहे.

पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारपासून; सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम

सेलू जि.परभणी : सेलू-सातोना रस्त्यावरील अशोकनगर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य श्री पंचमुखी पावन गणपती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त रविवारी, १७ डिसेंबररोजी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याप्रसंगी उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे सद्गुरू माधवानंद गुरू वामनानंद स्वामी महाराज यांची रथामध्ये प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्री केशवराज बाबासाहेब मंदिरापासून दुपार चार वाजता शोभायात्रा निघणार आहे. लोकमान्य टिळक पुतळा, क्रांतीचौक, नूतन रोड, अपूर्वा हॉस्पिटल, विद्यानगर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, विद्यानगर श्री हनुमान मंदिर, बाबासाहेब रोड पूल, सरस्वती शिक्षक कॉलनी मार्गाने श्री रेणुका मंगल कार्यालयात समारोप होणार आहे. श्री पंचमुखी पावन गणपती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून अशोकनगरमध्ये  विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी प्रायश्चित्त विधीनंतर शनिवार व रविवारी शांती पाठ, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राध्द ब्राम्हणवर्णन, दिगरक्षण, पंचगव्य करण, भूमिपूजन, कुंडपूजन, अग्निमंथन,अग्निस्थापन, देवता स्थापन, नवग्रहस्थापन, ग्रहहवन, जलाधिवास, सायंपूजन, आरती. सोमवारी, १८ डिसेंबररोजी माधवानंदगुरू वामनानंद स्वामी यांच्याहस्ते कलशारोहण व  प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती, आरती होणार आहे. सोमवारी, १८ डिसेंबर रोजी रेणुका मंगल कार्यालयात दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत श्री विश्वंभर दर्शन, महापूजा व भोजन महाप्रसाद आहे. भाविकांनी रविवारी शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे तसेच सोमवारी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरस्वती उपाध्ये, विना अशोक उपाध्ये, संचिता अभिजीत, जया मुकुंद आष्टीकर, श्रीनिवास आष्टीकर आदींंसह संयोजकांनी केले आहे.

शोभायात्रेमधील झांज पथक लक्षवेधी ठरणार आहे. डोक्यावर मंगल कलश घेऊन महिला भाविकांची उपस्थिती असेल. चिन्मयमूर्ती संस्थानचे सद्गुरू माधवानंद गुरू वामनानंद स्वामी महाराजांच्या शिष्य परिवारासह भजनी मंडळ, भाविकांचा शोभायात्रेमध्ये मोठा सहभाग असणार आहे.


पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारपासून; सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!