Panchmukhi Ganpati : सेलूतील श्री पंचमुखी गणपती प्रतिष्ठापनेची शोभायात्रा उत्साहात; ढोलताशा पथकाने वेधले लक्ष

Panchmukhi Ganpati : सेलूतील श्री पंचमुखी गणपती प्रतिष्ठापनेची शोभायात्रा उत्साहात; ढोलताशा पथकाने वेधले लक्ष

माधवानंद महाराजांसह भाविकांची मोठी उपस्थिती

सोमवारी, १८ डिसेंबररोजी माधवानंदगुरू वामनानंद स्वामी यांच्याहस्ते सकाळी श्री पंचमुखी पावन गणपती मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, पूर्णाहुती आदी कार्यक्रम आहेत. दुपारनंतर रेणुका मंगल कार्यालयात श्री विश्वंभर दर्शन, महापूजा, महाप्रसाद आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अशोक उपाध्ये, मुकुंद आष्टीकर, श्रीनिवास आष्टीकर आदींंसह संयोजकांनी केले आहे.

Panchmukhi Ganpati : सेलूतील श्री पंचमुखी गणपती प्रतिष्ठापनेची शोभायात्रा उत्साहात; ढोलताशा पथकाने वेधले लक्ष

सेलू जि.परभणी : सेलू-सातोना रस्त्यावरील अशोकनगरमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य श्री पंचमुखी पावन गणपती मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होत आहे. यानिमित्ताने रविवारी, १७ डिसेंबररोजी सायंकाळी शोभायात्रा मिरवणूक उत्साहात पार पडली. श्री केशवराज बाबासाहेब मंदिरापासून प्रारंभ झाला. रथामध्ये उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद गुरू वामनानंद स्वामी महाराज यांची उपस्थिती होती. सरस्वती, विणा व अशोक उपाध्ये, संचिता अभिजीत उपाध्ये, जया आष्टीकर, मुकुंद आष्टीकर, श्रीनिवास आष्टीकर आदींंसह शिष्यगण, मान्यवर सहभागी झाले होते. महिला पुरुषांनी फुगड्या घालत रंगत आणली ढोलताशा पथक लक्षवेधी ठरले. मंगल कलशधारी महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेणुका मंगल कार्यालयात समारोप झाला. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून अशोकनगरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. काळ्याशार पाषाणातील श्री पंचमुखी पावन गणपती मूर्तीला शेंदुरलेपनानंतर आणखी चैतन्य स्वरुप प्राप्त होणार आहे. दोन दिवसांपासून सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Panchmukhi Ganpati : सेलूतील श्री पंचमुखी गणपती प्रतिष्ठापनेची शोभायात्रा उत्साहात; ढोलताशा पथकाने वेधले लक्ष

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!