साईबाबा बँकेतर्फे लेफ्टनंट संगमेश मलवडेंचा सत्कार
दिनदर्शिकेचे विमोचन; मान्यवरांची उपस्थिती
सेलू : येथील शिक्षक कैलास मलवडे यांचे सुपुत्र संगमेश यांची (Indian Army) भारतीय सेना दलामध्ये लेफ्टनंट या अधिकारी पदावर नियुक्ती झाली. वयाच्या २१ व्या वर्षी याची लेफ्टनंट म्हणून निवड झाल्याबद्दल साईबाबा नागरी सहकारी बँकच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी, १५ डिसेंबर रोजी संगमेश यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, उपाध्यक्ष चंदशेखर मुळावेकर, रामराव सावंगीकर, रामराव लाडाणे, विनोद तरटे, योगेश कुलकर्णी, गंगाधर आडळकर, शेख इम्रान, मुश्ताकभाई, खाजाभाई गुत्तेदार, दत्ता पौळ,अविनाश आडाळकर, संतोष हुंगे, सुनील बोडखे, विलास पौळ, शेख अबूजर,नितीन आडळकर आदींची उपस्थिती होती. या वेळी संगमेश व मान्यवरांच्या हस्ते नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.