डॉ.उल्हास गोविंदराव देशमुख यांचे निधन; परभणीमध्ये झाले अंत्यसंस्कार
सेलू जि.परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागातील निवृत्त प्राध्यापक डाॅ.उल्हास गोविंदराव देशमुख (वय ८२, रा.रामकृष्णनगर, परभणी ) यांचे रविवारी, २४ डिसेंबररोजी परभणी येथे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. देशमुख यांनी परभणी येथील ग्राहक पंचायतीचे सचिवपद दीर्घकाळ सांभाळून जिल्हाभर ग्राहक जागृतीचे कार्य केले. समर्थ सहकारी गृह तारण संस्थेचे माजी सचिव तसेच निसर्गप्रेमी मंडळाचेही ते सदस्य होते. मराठवाड्यातील शेतकर्यांना व्यावसायिक फुल शेती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रीय लिखाण व आकाशवाणी परभणी केंद्राद्वारे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला. सेलू येथील आदर्श शिक्षक (कै.) गोविंदराव देशमुख गुरूजी यांचे चिरंजीव व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य, माजी विद्यार्थी म्हणून देशमुख परिवाराचे संस्थेशी जिव्हाळ्याचे नाते आहे. परभणी येथील अक्षरधाम स्मशानभूमीमध्ये सोमवारी (२५ डिसेंबर) त्यांच्या पार्थावावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयुर प्रिंटर्स नांदेडचे संचालक सतीशराव कुलकर्णी-देशमुख यांचे ते वडील बंधू होत.
श्री केशवराज बाबासाहेबांच्या यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरूवात