श्री केशवराज बाबासाहेबांचा पालखी सोहळा उत्साहात

श्री केशवराज बाबासाहेबांचा पालखी सोहळा उत्साहात

सेलू ( जि.परभणी) : येथील ग्रामदैवत, संत श्री साईबाबांचे सद्गुरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकूशाह) यांच्या २२४ व्या यात्रा महोत्सवानिमित्त मंगळवारी,२६ डिसेंबररोजी पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला.
श्री दत्त जयंतीला यात्रेचा मुख्य दिवस असतो. यानिमित्ताने सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ होती. दुपारी तीनच्या सुमारास मंदिरातून ‘श्री’ च्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली.यात्रेनिमित्त गुरुशंकर नागुला, ऋतुराज माने व मित्रमंडळींच्या पुढाकाराने मंदिर गाभाऱ्याच्या दर्शनी भागात नारळाच्या पानांची देखणी सजावट करण्यात आली आहे. पालखीलाही नारळाच्या पानांमध्ये नक्षीदारपणे सजविण्यात आले होते. नेहमीच्या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपरिक कानगी प्रसाद घेतला. महिला व पुरुष भजनी मंडळांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!