परभणीत स्मार्ट शेतीवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

परभणीत स्मार्ट शेतीवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या वतीने ‘अन्न सुरक्षा आणि शाश्वततेकरिता हवामान अनुकूल स्मार्ट शेती’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात झाली.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इन्द्र मणि तर प्रमुख पाहुणे अमेरिकेतील नेब्रासका विद्यापीठातील जैवप्रणाली व कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.संतोष पिटला, मिसिसिपी विद्यापीठातील (अमेरिका) कृषी हवामानशास्त्र, डॉ.प्रकाश कुमार झा होते. शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके, डॉ.गोपाल शिंदे, डॉ.सय्यद ईस्माइल आदींची उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ.मणि म्हणाले की ; विकसित राष्ट्रात डिजिटल शेती तंत्रज्ञानाचा वापर मोठा प्रमाणात आहे, या डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाडा व राज्यातील शेतकरी बांधवांना व्हावा, याकरिता परभणी कृषी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यापीठाने अनेक आतंरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार केले असून जास्तीत जास्त विद्यापीठ प्राध्यापक, शास्त्रज्ञ व आचार्य संशोधक विद्यार्थ्यांना देश-विदेशात प्रशिक्षणास पाठविले आहे. शास्त्रज्ञ डॉ.संतोष पिटला म्हणाले की, अमेरिकेत हवामान स्मार्ट शेतीसाठी तंत्रज्ञानाची साधने म्हणून रोबोटिक्सचा वापर शेतीत विविध कार्यासाठी केला जातो. भारतात ही शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर भविष्यात होणार असून देशातील शेतकरी बांधवांना उपयुक्त डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठातील शास्त्रज्ञ व आचार्य पदवीचे संशोधकांनी पुढाकार घ्यावा. तर तज्ञ डॉ.प्रकाश कुमार झा यांनी पदवीसाठी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ.भगवान आसेवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.सुनीता पवार यांनी केले आभार एस.एन.पवार यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!