साने गुरुजी कथामालेतर्फे विभागीय कथाकथन स्पर्धा

साने गुरुजी कथामालेतर्फे विभागीय कथाकथन स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी हेलस कथामाला, मानस फाऊंडेशनचा उपक्रम

सेलू जि.परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन, जालना यांच्या संयुक्त सहकार्याने पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठवाडापातळीवर विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. सर्व माध्यम व व्यवस्थापनांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे. सहभाग नोंदणीची अंतिम तारीख तीन जानेवारी आहे. संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी ही माहिती दिली आहे. या वेळी संयोजन समितीचे डॉ.सुहास सदाव्रते, सतीश कुलकर्णी, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ,  प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, ईश्वरदास मोताळे आदींची उपस्थिती होती.
स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेने ३० वर्षाची वाटचाल पूर्ण केली आहे. अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम कथामालेतर्फे राबविले जातात. त्याला ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. यावर्षी जिल्हास्तर फेरी ८ जानेवारीला, तर विभागीय फेरीतील स्पर्धा २२ जानेवारीला आहे. बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी व किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा आहे.️ मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड आवश्यक आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रमाणपत्र व श्यामची आई ग्रंथ भेट देण्यात येईल, तर विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येते. सहभाग नोंदणीची अंतिम तारीख तीन जानेवारी आहे. स्पर्धेसाठी जिल्हा समन्वयक छत्रपती संभाजीनगर : सुनील साबळे, गोकुळ शिनकर, जालना : आर.आर.जोशी, संदीप इंगोले, परभणी : डॉ.काशिनाथ पल्लेवाड, बाळू बुधवंत, नांदेड : व्यंकटेश चौधरी, विलास कोळनूरकर, लातूर : राम तत्तापुरे, चंद्रशेखर कळसे, बीड : वाय.जी.बेंबडे, बी.एल.चाटे, हिंगोली : संगिता देशमुख, सुवर्णा जाधव, धाराशिव : कुंडलीक पवार, सुभाष सुरवसे पुढाकार घेत आहेत. helaskathamala.blogspot.com   तसेच ९४२००३६९३५ या क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!