डॉ.अशोकराव जोगदंड यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धा; विजेत्यांचा गौरव
सेलू : येथील राजर्षी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेच्या जिजामाता बालविद्या मंदिर येथे संस्थापक अध्यक्ष डॉ.अशोकराव जोगदंड यांच्या स्मृति दिनानिमित्त विविध आंतरशालेय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विजेत्यांना सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रविंद्र पाठक होते. केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, डॉ.अनुराग जोगदंड, परीक्षक शेख मौजम अब्दुल्ला उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.अशोकराव जोगदंड यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. रविंद्र पाठक यांनीडॉ.जोगदंड यांच्या कार्यस्मृतींना उजाळा दिला. नूतन कन्या प्रशालेतील शिक्षक भालचंद्र गांजापूरकर यांनी शाळेच्या ग्रंथालयास अकराशे रुपये ग्रंथ भेट दिली. प्रास्ताविक भगवान पावडे यांनी केले.
विजेत्यांची नावे अशी : निबंध स्पर्धा प्रथम प्रगती माने (श्रीमती ल.ला.रा.नूतन कन्या प्रशाला), व्दितीय संचिता होगे (विवेकानंद प्राथमिक शाळा) तर तृतीय क्रमांक विभागून के.बा. प्राथमिक सेलूचा योगेश तळेकर व जिजामाता प्राथमिक धबडगे पूनम महेंद्र यांनी यश संपादन केले. स्पर्धेत नूतन कन्या, शारदा, श्री के.बा.,विवेकानंद, एकलव्य, जिजामाता, यशवंत प्राथमिक शाळेने सहभाग नोंदवला. रुपाली साडेगावकर, विजय चौधरी, महेंद्र धबडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश शेळके तर आभार कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी विष्णू कटारे, बाळू धनवे, सादेखा, तुकाराम अंभूरे यांनी परिश्रम घेतले. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली