सुरभी महोत्सव सेलूचे सांस्कृतिक वैभव : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवानिमित्य ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा व शिवपुत्र संभाजी महानाट्याचा सांस्कृतिक कार्यक्रम (२८) वार गुरुवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता रोडगे, सुरभी महोत्सवाचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा. प्रा. किरण पाटील, भाजपा परभणी जिल्हाध्यक्ष मा. संतोषजी मूरकटे, सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. पंडीतराव दराडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक मा. प्रशांत उरणकर, डॉ.रामरावजी रोडगे, डॉ अपुर्वा रोडगे, कृ.उ.बा.समीतीचे माजी सभापती रविभाऊ रोडगे, संचालक दत्ता कदम, माऊली ताठे, भाजपा परभणी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. ऋतुराज साडेगावकर, शैलेष तोष्णीवाल, परभणी भाजपा कार्यकर्ते अशोक बुधवंत, भाजपा तालूकाध्यक्ष वनिता चाफेकर, भाजपा शहराध्यक्ष अशोक अंभोरे, प्रा. बी. जी. खोडवे, अविनाश पवार, देवगीरी प्रांत अ.भा.ग्रा.पं.चे अध्यक्ष विलास मोरे, लक्ष्मण बागल, विलास शिंदे, तालूका प्रतिनीधी शिवाजी शिंदे, सिमा डख, . महेश मालपाणी, मंचक आचणे, ज्ञानेश्वर वायाळ संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, मुख्याध्यापिका शालिनी शेळके , करणसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रतिवर्षी प्रमाणे इयत्ता १० वर्गातून वैद्यनाथ हारकळ या विद्यार्थ्याला बेस्ट युवराज तर श्रुती बोराडे हिला बेस्ट युवराज्ञी या पुरस्काराने आमदर मेघनादिदी साकोरे बोर्डीकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. क्रीडा स्पर्धेतील विभागीय स्तरावर यश मिळविलेल्या व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याचे काम या सुरभी महोत्सवातून करत असल्याचे दिसून येत आहे. सेलू शहर हे मराठवाडयाची सांस्कृतिक राजधानी असून श्रीराम प्रतिष्ठाने आपल्या आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामधून सेलू शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज समोर बसलेल्या चिमुकल्यामध्ये उगवते अभिनेते, डॉक्टर , इंजिनियर्स दिसून येत आहेत. उपस्थित पालकांना विनंती की विद्यार्थ्यांना खेळ सांस्कृतिक कार्यक्रम भाषण उतरवले पाहिजे त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. संस्कारची जडणघडण कश्यापद्धतीने करावयाची हे या शाळेतून दिसते. असे प्रतिपादन आमदार मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांनी केले.
प्रा. किरण किरण बोलताना म्हणाले की, सुरभि महोत्सव हा श्रीराम प्रतिष्ठानचा उल्लेखनीय उपक्रम असून डॉ. संजय रोडगे यांनी सेलू शहरात शैक्षणीक वातावरणास चांगले वळण देत असल्याचे आज प्रत्यक्षदर्शी येथे आल्यास दिसले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थांना व्यासपीठ तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले हे विद्यार्थी दशेच्या दृष्टीने खुप महत्वाचे आहे.
रंग मराठी मातीचा ३०० हून अधिक बालकलाकारांणी आपल्या कलाप्रकारातून शिवपुत्र संभाजी महानाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजामाता, महाराणी येसूबाई, बहिर्जी नाईक, मोरोपंत, अणाजी पंत, सोमाजी दत्त, हंबीरराव मोहिते, औरंगजेब, दिलेरखान, मिर्झाराजे, रामसिंग, सर्व अष्टप्रधान मंडळ, मावळे आदी प्रमुख पात्र विद्यार्थी विद्यार्थिनीनी साकारले महाराष्ट्रातील सर्व सांस्कृतिची ओळख करून दिली. यामध्ये गोंधळ, धनगर गीत, शेतकरी गीत कोळी गीत, आदिवासी नृत्य, होळी नृत्य, वारकरी गीत, लावणी आदी महाराष्ट्रातील लोकधारावर आधरित विविध सामुहिक नृत्याचे बालकलाकारांनी सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, पालक सेलू शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणवर उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके यांनी केले. सूत्रसंचालन संजय ठाकर, दिगंबर टाके व संदीप आकात, संध्या शिलार, अनुजा कवडे, दर्शना कव्हळे, वेदिका डख यांनी केले.