ग्राहकांनी सदैव जागरूक राहावे : सेलूमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

ग्राहकांनी सदैव जागरूक राहावे : सेलूमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

सेलू : येथील नूतन महाविद्यालय येथील सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांनी सदैव जागरूक राहणे आवश्यक आहे, असे मत या वेळी मार्गदर्शन करतांना विविध वक्त्यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू, तहसिल कार्यालय आणि नूतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, ३० डिसेंबर रोजी हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाटील, तहसीलदार दिनेश झांपले, प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय ग्राहक पंचायत देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.विलास मोरे, नायब तहसीलदार गजानन इनामदार, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, तालुका संघटक सुनील गायकवाड, सचिव मंजुषा कुलकर्णी, किरण सोळंके, तालुका उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, प्रा.डॉ. सुषमा सोनी, अशोक राऊत, सिद्धार्थ गायकवाड, ललिता गिल्डा, जयचंद खोना, ॲड.भूषण गेना, योगेश कथले,अरुण आढे, सचिन कोरडे, प्रदीप मुनेश्वर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आयोजक तहसीलदार दिनेश झांपले यांनी केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांताध्यक्ष डॉ.विलास मोरे व शाखा व्यवस्थापक विजय पाटील, प्रा.डॉ.सुषमा सोनी यांनी ग्राहक चळवळीच्या अनुषंगाने आणि ग्राहक यांचे हित यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागरिक, महिला यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!