‘दीपस्तंभ’च्या सांस्कृतिक महोत्सवाला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद

‘दीपस्तंभ’च्या सांस्कृतिक महोत्सवाला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद

सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या यात्रेनिमित्त उपक्रम

दीपस्तंभ'च्या सांस्कृतिक महोत्सवाला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद

सेलू/परभणी : सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या (व्यंकुशाह ) २२४ व्या यात्रा महोत्सवानिमित्त दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या मैदानावर गुरूवारी, २८ डिसेंबररोजी सायंकाळी आमदार मेघना-साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रा.किरण पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे, पंडितराव दराडे, तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, डॉ.ऋतुराज साडेगावकर, ललिता गिल्डा, करुणा कुलकर्णी, दिनकर वाघ, रवींद्र डासाळकर, संजय लोया आदींची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवात ‘चौकडीच्या करामती’ मधील कलाकारांनी रसिकांना भरभरून हसविले. शुक्रवारी, २९ डिसेंबर रोजी केशव महाराज उखळीकर यांचे विनोदी शैलीतील कीर्तन रंगले. जीवनाच्या भवसागरातून तरुन जाण्यासाठी भगवंताच्या नामस्मरण हेच एकमेव साधन असल्याचे उखळीकर यांनी सांगितले. या महोत्सवाने सेलू शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे, असे आमदार बोर्डीकर यांनी यावेळी नमूद केले. महोत्सवासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष‌ ॲड.दत्तराव कदम, शंकर भोंडवे, कपिल फुलारी, गणेश काटकर, सतीश धानोरकर, माऊली ताठे, अर्जुन बोरुळ, मयुर वाघ, बाळासाहेब काजळे, संदिप बोकन, विठ्ठल कोकर, गणेश सवणे, अनिल पवार, भास्कर पडघन प्रकाश शेरे, वनिता चाफेकर अशोक अंभोरे आदींसह भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!