निबंधक कार्यालयाच्या इमारत बांधकामाचे जिंतूरमध्ये भूमिपूजन; आमदार मेघना बोर्डीकरांच्या प्रयत्नांना यश

निबंधक कार्यालयाच्या इमारत बांधकामाचे जिंतूरमध्ये भूमिपूजन; आमदार मेघना बोर्डीकरांच्या प्रयत्नांना यश

जिंतूरमध्ये दोन कोटींची प्रशस्त इमारत उभी राहणार

जिंतूर/परभणी : दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या जिंतूर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-एक कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामांचे भूमिपूजन शनिवारी (३० डिसेंबर) आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी तहसीलदार राजेश सरवदे, दुय्यम निबंधक एस.टी.यादव, माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, डॉ.पंडित दराडे, लक्ष्मण बुधवंत, सुनील भोंबे, प्रदीप चौधरी, अभियंता एस.जी.उमरेकर, कृष्णा राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या अनेक वर्षापासून दुय्यम निबंधक कार्यालय इमारतीचे बांधकाम प्रलंबित होते. आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपयांची प्रशस्त इमारत तहसील कार्यालय आवारामध्ये उभी राहणार आहे. जिंतूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फेत हे काम होत आहे. सर्वच सरकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. कार्यालय स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा, असे बोर्डीकर यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सरकार आग्रही आहे, असेही बोर्डीकर यांनी या वेळी स्पष्ट केले. विजय वाकळे, भगवान वटाणे, सुनील मते,कैलास खंदारे, रवी घुगे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!