शाळा विद्यार्थ्यांना घडवणारे मंदिर : गजानन देशमुख; सेलूतील ‘नूतन’च्या स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन
सेलू/परभणी : सेलू येथील नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोमवारी, एक जानेवारी रोजी मोठ्या जल्लोषात झाले. उद्घाटक म्हणून व्हाईस ऑफ मिडियाचे परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख उपस्थित होते. या वेळी देशमुख म्हणाले, की शाळा विद्यार्थ्यांना घडवणारे मंदिर आहे.
अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक के.के.देशपांडे, तर प्रमुख पाहुण्या म्हणून दामिनी पथकाच्या अस्मिता मोरे, सतीश नावाडे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव, डी.डी.सोन्नेकर, नागेश कान्हेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी देशमुख म्हणाले, की शाळेतील स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक सूप्त कला गुणांना भरपूर वाव मिळत असतो. भावी वाटचालीसाठी अनेकांना स्नेहसंमेलन प्रेरणादायी ठरत असते. शाळा हे विद्यार्थ्यांना घडवणारे मंदिर आहे. शालेय जीवन हे खूप महत्वाचे असते. शिक्षण हे नागरिक घडवण्याचे काम करते. आत्मविश्वासाने यशस्वी वाटचाल करावी.’ याप्रसंगी ४० विद्यार्थीनींनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविक के.डी.पल्लेवाड यांनी केले. यंदाच्या स्नेहसंमेलनामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ५२ सांस्कृतिक उपक्रम तसेच विविध प्रकारच्या वैयक्तिक, सांघिक क्रीडा स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. सूत्रसंचालन शिल्पा बरडे, अनुजा सुभेदार यांनी केले. गणेश माळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भगवान देवकते, आदिती अंबेकर, मीरा शेटे, उमेश क्षीरसागर, आश्विनी पटाईत, सुरेश हिवाळे, प्रशांत नाईक, बाळू बुधवंत, संध्या फुलपगार आदींंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.