पं.कृष्णेंद्र वाडीकर, हेमांगींच्या मैफलीने श्रोत्रे मंत्रमुग्ध; सेलूतील हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत महोत्सवाची सांगता

पं.कृष्णेंद्र वाडीकर, हेमांगींच्या मैफलीने श्रोत्रे मंत्रमुग्ध; सेलूतील हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत महोत्सवाची सांगता

सेलू/ परभणी : संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत समारोहात तिसऱ्या व अंतिम सत्राची सुरूवात पांडुरंग पवार (पुणे)यांच्या तबला सोलो वादनाने झाली. त्यानंतर इंदोर येथील जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका हेमांगी नेने (हैदराबाद) यांचे गायन झाले.पं. कृष्णेंद्र वाडीकरांचा दमदार ‘जोग’ने महोत्सवाची सांगता झाली. 
डॉ.शशीकांत तांबे, शुभदा मराठे यांच्या तालमीत तयार झालेल्या हेमांगी यांनी अतिशय तडफेने केलेले सादरीकरण लाजवाब असे होते. अनोख्या अंगाने सादर केलेला सुरूवातीचा यमन अविस्मरणीय होता.हळूवार व लडिवाळ पद्धतीचे प्रस्तुतीकरण मनाला भिडणारे होते. त्यानंतर या गायिकेने मिश्र पिलू रागात सादर केलेली ‘पिया बीना लागेना मोरा जीया’ कजरी अप्रतिम होती. त्यांना साथसंगत करणारे शांतीभुषण चारठाणकर, यश खडके यांनी अतिशय सुरेख साथसंगत केली.सूत्रसंचालन योगेश ढवारे तर आभार रवी कुळकर्णी यांनी मानले.

पं.कृष्णेंद्र वाडीकर, हेमांगींच्या मैफलीने श्रोत्रे मंत्रमुग्ध; सेलूतील हरिभाऊ चारठाणकर स्मृती संगीत महोत्सवाची सांगता

पं. कृष्णेंद्र वाडीकरांचा दमदार ‘जोग’…

किराणा घराण्याचे लोकप्रिय गायक हुबळीचे पं. कृष्णेंद्र वाडीकर यांनी चारठाणकर महोत्सवाची समारोपाची शिखर मैफल आपल्या जोमदार गायनाने जिंकुन घेतली. त्यांच्या दमदार आवाजात जोग रागाची आलापी सुरू होताच रसिकांत आनंदाची लहर उमटली. जोगची द्रूत बंदीश ‘साजन मोरे घर आये’ सुरू होताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तबल्यावर पांडुरंग पवार आणि संवादिनीवर शांतीभुषण देशपांडे यांनी नेमकी पोषक पुरक अशी साथ केली. जोग नंतर ‘पिया मिलन की आस’ मधली तन्मयता ‘पावलो पंढरी। वैकुंठ भुवन । धन्य आजी दिन । सोनियाचा ।।’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाची आर्तता अतिशय भिडणारी होती. ‘कायो करूणा निधे’ हे कानडी भजन विशेष फर्माईशीवरून बुवांनी सादर केले. ‘अगा वैकुंठीच्या राया’ या अभंगाने मैफिलीची सांगता झाली. गेली दोन दिवस तीन सत्रांत मिळून हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. आयोजकांचा नेटकेपणा, रसिकांचा उत्स्फुर्तपणा, कलाकारांनी घडवलेले आपल्या प्रतिभेचे दर्शन, मन:पूर्वक केलेले सादरीकरण, गायनाचे नवीन प्रयोग सादर करत शास्त्रीय संगीत क्षेत्राचे उज्ज्वल भवितव्य अधोरेखीत केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!