Sports : नूतन विद्यालयातील कबड्डी स्पर्धा उत्साहात; उद्योजक रामप्रसाद घोडके यांची उपस्थिती 

Sports : नूतन विद्यालयातील कबड्डी स्पर्धा उत्साहात; उद्योजक रामप्रसाद घोडके यांची उपस्थिती 

जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच एक तरी खेळ जोपासला पाहिजे. खेळांतून निर्णयक्षमता, आत्मविश्वास दृढ होण्यासाठी मदत होते. सांघिक खेळ भावनेचा विकास होतो. विशेषतः मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे मत आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक तथा उद्योजक रामप्रसाद घोडके यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सेलू जि.परभणी : नूतन विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन उद्योजक रामप्रसाद घोडके यांच्या हस्ते शनिवारी, ६ जानेवारी रोजी उत्साहात झाले. ४२ मुलामुलींच्या संघांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, नंदकिशोर बाहेती, संतोष पाटील, के.के.देशपांडे, गणेश माळवे यांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना उद्योजक रामप्रसाद घोडके म्हणाले की, जीवनात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच एक तरी खेळ जोपासला पाहिजे. खेळांतून निर्णयक्षमता, आत्मविश्वास दृढ होण्यासाठी मदत होते. संमेलनाअंतर्गत अंतर्गत खो खो, व्हॉलीबॉल, टेनिस व्हाॅलीबाॅल, कबड्डी आदी सांघिक खेळांसह वैयक्तिक, मैदानी खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी स्पर्धेत विविध वयोगटातील ४२ मुलामुलींच्या संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धा पंच, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!