Nitin Chashak Cricket : सेलूतील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या खेळपट्टीचे भूमीपूजन; मान्यवरांची उपस्थिती

Nitin Chashak Cricket : सेलूतील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या खेळपट्टीचे भूमीपूजन; मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, मालेगाव, परभणी आदी शहरातील १६ नामवंत क्रिकेट संघाना निमंत्रित करण्यात आले आहे प्रथम पारितोषिक रोख एक लाख रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ७१ हजार रुपये व चषक तसेच मालिकावीर पुरस्कार रोख २५ हजार रुपये व प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

सेलू जि.परभणी : येथील नितीन व्यायाम, कला, क्रिडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रिताच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धच्या खेळपट्टीच्या कामाला रविवारी सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, प्रभाकर सुरवसे, नामदेव डख, अजय डासाळकर, नारायण पाटील, श्रीपाद कुलकर्णी, शिवाजी आकात, विलास शिंदे, संतोष शिंदे, संदीप लहाने, प्रा.नागेश कान्हेकर, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे आदींची उपस्थिती होते.

१५ ते २३ जानेवारी या कालावधीत नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या स्पर्धेत राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, मालेगाव, परभणी आदी शहरातील १६ नामवंत क्रिकेट संघाना निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये व चषक द्वितीय पारितोषिक ७१ हजार रुपये व चषक तसेच मालिकावीर पुरस्कार रोख २५ हजार रुपये व प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार रोख रक्कम आहे. निमंत्रित संघाची निवास व भोजनाची संयोजन समिती कडून मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. प्रास्ताविक राजेश राठोड यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी तर गणेश माळवे यांनी आभार मानले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!