टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंना आरक्षणासाठी मागणी; क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना संघटनेचे निवेदन‌

टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंना आरक्षणासाठी मागणी; क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना संघटनेचे निवेदन‌

टेनिस व्हॉलीबॉल खेळाडूंना आरक्षणासाठी मागणी; क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना संघटनेचे निवेदन‌

परभणी : क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळास 5% आरक्षण व शासकीय सुविधा बाबत निवेदन ८ जानेवारी रोजी परभणी येथे राज्य सचिव गणेश माळवे व उदगीर उद्योजक अशोक बाहेती यांनी देऊन मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारतीय टेनिस व्हॉलीबॉल या खेळांची निर्मिती लातूर (महाराष्ट्र) येथील डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी केली आहे. आजपर्यंत टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या २५ राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच शालेय स्तरावर टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आहे. केंद्रीय मान्यता पञ प्राप्त झाले आहे. तरी महाराष्ट्र शासनाने भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळास राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन व 5% आरक्षण व शासकीय सुविधा उपलब्ध करुन देऊन गोरगरीब खेळाडूंना फायदा होईल. ह्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य संघटनांचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्यात पुणे येथे आहे. आपल्या भारतीय खेळाडूंना या खेळाचा फायदा व्हावा. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास, आपल्या महाराष्ट्र राज्याचा झेंडा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनातून संपूर्ण जगात पोहचण्यासाठी मदत होईल.अशी मागणी सर्व राष्ट्रीय व राज्य खेळाडू व संघटक करत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!