सेलूतील श्रीकालिंकादेवीचा वार्षिकोत्सव सोहळा उत्साहात 

सेलूतील श्रीकालिंकादेवीचा वार्षिकोत्सव सोहळा उत्साहात 

विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती

सेलू, दि ९ जानेवारी : सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाची कुलदेवता श्री कालिंका देवी मंदिर संस्थानच्या वतीने सोमवारी, ८ जानेवारी रोजी श्री कालिंका देवीच्या प्रतिष्ठापनेच्या २६ व्या वार्षिकोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी संस्थानचे अध्यक्ष अशोकराव कासार होते. कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर,अशोक काकडे, रामनाना खराबे, अरुणराव वेळापुरे, मुकुंद लहाने, मंगल कथले, विलासराव वानरे, सुधाकर अंदोले, त्रिंबकराव सासवडे, शंकरराव हेलसकर, रामप्रसाद वराडे ,सुनिता हेलसकर, वंदना खरावणे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी स्नेहल वानरे, नंदिनी खरावणे, शिवम खरावणे, वैभवी खरावणे आदी गुणवंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला‌. श्री कुलस्वामिनी कालिंका देवी सहस्त्रनाम महामंडल महापूजा झाली. महाप्रसादाचे यजमान भोगाव (ता.जिंतूर) दामोधर, महावीर, फुलचंद आहेर परिवाराने यामध्ये सहभाग घेतला‌. या वेळी शरद भांडेकर, रामनाना खराबे आदींंसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक गोपाळराव सासवडे यांनी केले. सूत्रसंचालन गजानन हेलसकर यांनी केले. महावीर आहेर, रामप्रसाद तांबट, मुंजाभाऊ शेटे, मुकुंदराव लोखंडे, प्रशांत शेटे, चंद्रकांत सासवडे, जीवन खरावणे, शिवाजीराव शिनगारे, अशोक वानरे, अनंतकुमार विश्वंभर, प्रभाकर खरावणे, बाबासाहेब हेलसकर, बाळकृष्ण हेलसकर, माधवराव वानरे, अरुण गोरे, मधुकर हलगे, धर्मकुमार वानरे, जीवन खरावणे, गोपाळराव हेलसकर, दिलीप कुंभकर्ण, मीरा हलगे, शोभा वानरे, विष्णुपंत खरावणे, अरुण ढोके, प्रशांत वानरे आदींंसह सेलू्तील कासार समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!