कथाकथन स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूमध्ये गौरव
हेलस साने गुरुजी कथामालेचा उपक्रम, जिल्हास्तरीय फेरी उत्साहात; उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कथाकार बबन आव्हाड यांची उपस्थिती
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रसिद्ध कथाकार बबन आव्हाड म्हणाले की,’ गोष्ट सांगणे ही प्राचीन कला असून कथा वाचन, कथाकथनातून विद्यार्थी मानसिक, भावनिक, बौद्धिक दृष्टीने समृद्ध होतात. कथाकथन स्पर्धा ही विद्यार्थ्यांतील कथाकाराला प्रेरणा देणारी आहे.
सेलू/परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस व मानस फाऊंडेशन, जालना यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धेची परभणी जिल्हा फेरी सोमवारी (८ जानेवारी ) उत्साहात पार पडली. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सेलू येथील नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात कथाकार बबन आव्हाड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. प्रारंभी पूज्य साने गुरुजी व दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक किरण देशपांडे होते. परीक्षक भगवान कुलकर्णी, सुरेश हिवाळे, भगवान पावडे, पी.एस. वाढेकर यांची उपस्थिती होती. बबन आव्हाड म्हणाले की,’ गोष्ट सांगणे ही प्राचीन कला असून कथा वाचन, कथाकथनातून विद्यार्थी मानसिक, भावनिक, बौद्धिक दृष्टीने समृद्ध होतात. कथाकथन स्पर्धा ही विद्यार्थ्यांतील कथाकाराला प्रेरणा देणारी आहे. जिल्हा संयोजक डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. बाळू बुधवंत यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बाबासाहेब हेलसकर, कीर्ती राऊत, केशव डहाळे, अरूण रामपुरकर आदींंसह विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती.
परभणी जिल्हास्तरीय विजेते
बालगट : प्रथम-अक्षरा गजानन पवार ( नूतन कन्या प्रशाला, सेलू), द्वि,तीय – सना सय्यद जिशौकत ( जिजामाता बाल विद्यामंदिर, सेलू ) तृतीय- प्रिया विष्णू मगर ( जि.प. प्रा. शाळा ढेंगळी पिंपळगाव )
किशोर गट : प्रथम – प्रतीक्षा छत्रगुण मोगल (नूतन कन्या प्रशाला, सेलू), द्वितीय – शंतनू शाम पवार (नूतन विद्यालय सेलू ), तृतीय- अलफिया अल्ताफ कुरेशी (नूतन कन्या प्रशाला, सेलू