विवेकानंद शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात

विवेकानंद शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात

सेलू ः शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयाची सहल यशवाडी श्रीपारदेश्वर महादेव मंदिर ,श्रीराम बाग ( परभणी ) येथे ८ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाली. यशवाडी येथील प्रसिद्ध श्रीनुमानाचे दर्शन,प्रसिद्ध श्रीपारदेश्वर महादेव दर्शन तसेच श्रीराम बाग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गाचा आनंद घेतला. वॉटर पार्क मधील संगीत कारंज्याचा मनमुराद आनंद घेतला.चित्रपट गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला व संगीतखुर्चीची मजा घेतली. सहल यशस्वीतेसाठी रागिणी जकाते ,विजय चौधरी ,काशिनाथ पांचाळ,दीपाली पवार,शारदा पुरी,चेतन नाईक,चंदू कव्हळे यांनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!