Best Chairman Award : हेमंतराव आडळकर यांना सर्वोत्कृष्ट चेअरमन पुरस्कार जाहीर
विविध स्तरांतून अभिनंदन; आठ एप्रिलरोजी नवी दिल्लीत वितरण
सेलू जि.परभणी : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव मुरलीधरराव आडळकर यांना नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अचिव्हमेंट्स फाउंडेशनच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट चेअरमन परफॉर्मन्स अवॉर्ड फॉर को-ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट विथ मेडल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. फाऊंडेशनचे सचिव डी.पी.सेमवाल यांनी गुरुवारी (११ जानेवारी) रोजी पत्राद्वारे या बाबत कळविले आहे. आठ एप्रिलरोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल आडळकर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.