विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार मेघना बोर्डीकर
नरसापूर-बोरकीनी-नांदगाव पूलाचे भूमीपूजन
सेलू : जिंतूर, सेलू विधानसभा मतदार संघात विकास कामांना निधी कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी शुक्रवारी, १२ जानेवारी रोजी बोरकीनी येथे केले. नांदगाव-नरसापूर -बोरकीनी पूलांच्या भूमीपूजनप्रसंगी आमदार बोर्डीकर बोलत होत्या. या वेळी डॉ.संजय रोडगे, खंडेराव आघाव, दत्तराव कदम, अशोक अंभोरे, दिनकर वाघ, माऊली ताठे, भागवत दळवे, शिवहरी शेवाळे, गणेश काटकर, लक्ष्मण गायके, मयूर वाघ, संगिता जाधव, भारत इंद्रोके, माऊली शिंदे,गजानन घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतरही नांदगाव-नरसापूर -बोरकीनी या गावांना जोडणारा पूल नसल्याने या गावातील नागरीकांना त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र, माझ्या कार्यकाळात सरकारकडे पाठपूरावा करून या पूलासाठी ४ कोटी ३४ लाख रूपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. आता या गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच बोरकीनी येथे दलीतवस्ती १५ लाख व नरसापूर दलीतवस्ती १० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे महिलांनी दारूबंदीसाठी प्रयत्न करण्याचे अवाहन केले. बोरकीनी नरसापूर ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांनी राष्ट्रवादी पक्षाला कंटाळून भारतीय जनता पक्षांमध्ये जाहीर आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी स्वागत केले. यामध्ये बोरकिनी येथील सरपंच कल्पना हनुमान मुसळे, उपसरपंच कृष्णा नरोटे, तसेच पॅनल प्रमुख संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादराव घुगे, कैलास ढाले,केशव पाटील मुसळे,गोविंद मुसळे , शिल्पकार ढाले ,संभाजी मुसळे ,पाराजी हावळे रमेश आघाव, केशव आघाव विजय कुटे, राजभाऊ ढाले, मधुकर घुगे, उद्धव मुसळे,सुदाम घुगे,पंजाब ढाले, रामराव मुसळे, नामदेव मुसळे, देवदास मुसळे ,नामदेव आघाव ,माधव गीते, दत्ता मुसळे ,गजानन वाकडे ,विष्णू नरोटे ,मारुती ढाले ,रोहिदास जावळे ,गणेश मुसळे ,प्रकाश घुगे ,योगेश घुगे, प्रमोद शिंदे, नार्या शंकर गळगे,समाधान तरटे ,गोपाळ हावळे, विलास ढाले ,राजेश घुगे, संजय नाळे ,बापूराव ढाले, शेषराव ढाले आदींचा सहभाग होता.कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिल्पकार ढाले तर सूत्रसंचलन बाळासाहेब आघाव यांनी केले. या वेळी भारतीय जनता पार्टीच्या सेलू शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक अंभोरे यांच्या सत्कार करण्यात आला.