बोरकिनीच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा भाजपामध्ये प्रवेश

बोरकिनीच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा भाजपामध्ये प्रवेश

आमदार मेघना बोर्डीकरांसह भाजप नेत्यांची उपस्थिती

सेलू : राष्ट्रवादी पक्षाला कंटाळून बोरकिनी येथील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भारतीय जनता पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. बोरकिनी येथे विविध विकास कामांचे उद्घाटनप्रसंगी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा झाला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. संजय रोडगे, खंडेराव आघाव, दिनकर वाघ, अशोक अंभोरे, माऊली ताठे, अजय डासाळक,र भागवत दळवे, दत्तराव कदम, गणेश काटक, संगीता जाधव, शिवहरी शेवाळे लक्ष्मण गायके, भारत इंद्रोके, माऊली शिंदे, गजानन घुगे, प्रकाश ताटे, अशोक खुपसे. साळेगावकर आप्पा. अजित मोगल. मयूर वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. बोरकिनीच्या सरपंच कल्पना हनुमान मुसळे, उपसरपंच कृष्णा नरोटे, तसेच पॅनल प्रमुख संदीप घुगे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाराव घुगे, कैलास ढाले,केशव पाटील मुसळे, गोविंद मुसळे, शिल्पकार ढाले, संभाजी मुसळे, पाराजी हावळे, रमेशराव आघाव, केशवराव आघाव, विजू कुठे , राजभाऊ ढाले, मधुकर घुगे, उद्धव मुसळे, सुदाम घुगे, पंजाब ढाले, रामराव मुसळे, नामदेवराव मुसळे, देवदास मुसळे ,नामदेव आघाव ,माधव गीते, दत्ता मुसळे ,माझी मेंबर गजानन वाकडे ,विष्णू नरोटे ,मारुती ढाले ,रोहिदास जावळे ,गणेश मुसळे ,प्रकाश घुगे ,योगेश घुगे, प्रमोद शिंदे, शंकर गळगे,समाधान तरटे ,गोपाळ हावळे, विलास ढाले ,राजेश घुगे, संजय नाळे ,बापूराव ढाले, शेषराव ढाले आदींसह अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांना आणि पक्षातील गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार बोर्डीकर यांच्या नेतृत्वात जिंतूर सेलू तालुक्यात होत असलेली विविध विकास कामे आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे केंद्रातील नेतृत्व, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची विविध ध्येयधोरणे व विकास कामे कामें बघून तरुणाईचा कल भारतीय जनता पार्टीकडे वळण्याचा दिसून येत आहे. सूत्रसंचालन बाळासाहेब आघाव यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!