Press Club : रामप्रसाद घोडके यांना उद्योगरत्न, मुकुंद सावजी यांना सहकार भूषण पुरस्कार
जिंतूर तालुका प्रेस क्लब व व्हॉइस ऑफ मिडियाचा उपक्रम, २१ जानेवारीला वितरण
परभणी : दर्पण दिनानिमित्त जिंतूर तालुका प्रेस क्लब व व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. जिंतूर येथील सुंदरलाल सावजी बँकेचे चेअरमन मुकुंद सावजी कळमकर यांना सहकार भूषण, तर परभणी येथील आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक रामप्रसाद घोडके यांना उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विजय चोरडिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मुकुंद सावजी हे मागील अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. अनेक बेरोजगारांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात सुंदरलाल सावजी बँकेच्या माध्यमातून जिंतूरला नावलौकिक मिळवून दिला आहे. याची दखल घेऊन सावजी यांना सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रामप्रसाद घोडके यांनी आर.बी.घोडके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेडच्या माध्यमातून राज्यभरात रस्ते तसेच उच्चपातळी बंधारे निर्मिती क्षेत्रामध्ये गुणवत्ता, दर्जा व विश्वास टिकवून ठेवला आहे. अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. कमी वेळेत व दर्जेदार निर्माण करून त्यांनी या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला आहे. राज्य सरकारच्या उत्कृष्ट कंत्राटदार यासह सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील पुरस्कारांनी घोडके यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. घोडके यांच्या योगदानाबद्दल उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, पगडी, शाल, श्रीफळ असे आहे. जिंतूर येथील भाजी मंडी मैदानावर २१ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन आवाहन व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख यांनी केले आहे.