कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी; सेलूतील यशवंत विद्यालयात कथामालेची विभागीय स्पर्धा

कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी; सेलूतील यशवंत विद्यालयात कथामालेची विभागीय स्पर्धा

हेलस साने गुरुजी कथामाला व मानस फाऊंडेशनचा उपक्रम

कथाकथन स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी; सेलूतील यशवंत विद्यालयात कथामालेची विभागीय स्पर्धा

कथाकथन स्पर्धेची मराठवाडा विभागीय जिल्हाफेरी ८ जानेवारी रोजी पार पडली. या फेरीत बालगट इयत्ता ५ वी ते ७ वी आणि किशोर गट इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटात एकूण ३२८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दोन्ही गटातील प्रथम पारितोषिक पटकावलेल्या स्पर्धकांच्या अंतिम फेरीतील विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात येणार आहे.अंतिम फेरीपात्र मराठवाड्यातील स्पर्धकांनी मार्गदर्शक शिक्षकांसह स्पर्धा केंद्रावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे संयोजक तथा अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी कळविले आहे.

जालना/परभणी : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस (ता.मंठा )आणि मानस फाऊंडेशन, जालना आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा अंतीम फेरी शुक्रवारी, १९ जानेवारी रोजी सेलू (जि.परभणी) येथील यशवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सकाळी ११ वाजता होत आहे. 
उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा साने गुरुजी कथामाला संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा.बसवराज कोरे उपस्थित राहणार आहेत.‌ बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेलू येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मानस फाऊंडेशनचे प्रमुख डाॅ.प्रकाश आंबेकर, साने गुरुजी कथामाला संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे निमंत्रक डाॅ.सुहास सदाव्रते, महोत्सव समितीचे प्रमुख कार्यवाह तथा जालना जिल्हा संयोजक आर.आर.जोशी, नांदेड जिल्हा संयोजक व्यंकटेश चौधरी, डाॅ.यशवंत सोनुने, यशवंत विद्यालय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे, माध्यमिक विभागाचे रतन थटवले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विभागीय कथाकथन अंतिम फेरीस मराठवाड्यातील निवड झालेल्या स्पर्धकांनी मार्गदर्शक शिक्षकांसह स्पर्धा केंद्रावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे, असे संयोजक तथा अध्यक्ष कल्पना दत्तात्रय हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, बाबासाहेब हेलसकर, ईश्वरदास मोताळे यांनी कळविले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!