राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत तुलशी परभणी व शेकप बीड विजयी

राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत तुलशी परभणी व शेकप बीड विजयी

राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत तुलशी परभणी व शेकप बीड विजयी

सेलू : सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४ नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. १६ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी सकाळी दुसरा सामना तुलशी परभणी वि. जय बजरंग वर्धा दरम्यान ने परभणी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 137 धावात/9 बाद झाले यात निखिल मदस धावा,सकाळी झालेल्या सामन्यात तुलसी परभणी विरुद्ध जय बजरंग वर्धा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 17.3 षटकात सर्व बाद 137 धाव केल्या त्यात सौरभ शिंदे 48 चेंडूत 60धावा केल्या निखिल मदस ने 25 धावा केल्या वर्धा संघाच्या वतीने गोलंदाजी प्रथमेश बेलुरकर व संजय सिंग पनवार यांनी 3-3 गडी बाद केले. प्रतिउत्तर देताना वर्धा संघाने 20 षटकात सर्व गडी बाद 129 धावा केल्या . यात आदित्य लहाने,24 व यश तिटरे 28 धावा केल्या. तुलसी परभणी घ्या वतीने भेदक मारा सुफियांन अहमद 4 गडी बाद केले तर उमेश शोभणे 2 गडी बाद करत विजय खेचून आणला. सामन्याचा सामना वीर पुरस्कार .सुफियांन अहमद यास देण्यात आला.तुलसी परभणी संघाने 8 गडी राखून विजय प्राप्त केला.

दुपार सत्र मध्ये शेकप बीड विरुद्ध अमरदीप रोडे परभणी यांचा मध्ये अमर्दिप रोडे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी केली 15.2षटकात सर्व गडी बाद 78 धाव केल्या शेकप बीड कडून जफर शेख हा सामना वीर ठरला निर्धारित 3 षटकात त्याने 1 निर्ढाव षटक व 15 धाव देऊन 3 गाडी बाद केले.शेकप बीड संघाने हा सामना एकतर्फी जिंकला.सामनावीर पुरस्कार देताना मंडळाचे अध्यक्ष मा.आ. हरीभाऊ काका लहाने, रामेश्वर गटकळ, रणजित गजमल, कुणाला लहाने उपस्थित होते.पंच गंगाधर शेवाळे, आसेर सिद्दीकी तर समालोचन अनिल शेळके, मोहन बोराडे, यासेर यांनी केले.स्पर्धा संयोजक : प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे, सहसंयोजक : संतोष कुलकर्णी, अविनाश शेरे, कल्याण पवार, सय्यद हमिद, शेख अब्दुल (पेंटर),क्रीडांगण प्रमुख : सतीश नावाडे, राजेश राठोड, दिपक निवळकर, कुणाल लहाने, आदी काम पाहणार आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!