सेलूतील नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात; नांदेड संघाची विजयी सलामी 

सेलूतील नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात; नांदेड संघाची विजयी सलामी 

उद्घाटनप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे म्हणाले, ” सेलू शहरात गेल्या २४ वर्षांपासून माजी आमदार हरिभाऊ लहाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून देतात, हे गौरवास्पद आहे. संदीप लहाने व टीमने यासाठी विशेष प्रयत्न करून स्पर्धेच्या तसेच क्रीडा क्षेत्राच्या लौकिकात भर घातली आहे.

सेलूतील नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात; नांदेड संघाची विजयी सलामी 

सेलू जि.परभणी : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते सोमवारी, १५ जानेवारी रोजी झाले. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, आयोजक माजी आमदार हरिभाऊ लहाने, डॉ.जनार्धन गोळेगांवकर, एस.एन.केंद्रे, कृष्णा देशमुख, नामदेव अप्पा डख, प्रसाद डासाळकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, गिरीश लोडाया यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. डॉ.काळे यांनी म्हणाले की; सेलू शहरात गेल्या २४ वर्षांपासून माजी आमदार हरिभाऊ लहाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनातून नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध करून देतात, हे गौरवास्पद आहे. प्रास्ताविक हरिभाऊ लहाने यांनी केले. सूत्रसंचालन मोहन बोराडे यांनी केले. संदीप लहाने यांनी आभार मानले. सेलू तालुका क्रिकेट संघटना व नितिन व्यायाम शाळा कला, क्रीडा, सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धा नऊ दिवस रंगणार आहेत. १६ नामवंत संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. २३ जानेवारीला कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, विप्लव बाजोरिया, सुरेश जाधव, हेमंतराव आडळकर, डॉ.संजय रोडगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे.

२४ व्या स्पर्धेत राज्यातील नामवंत १६ संघाचा समावेश आहे. २० षटकांचे सामने खेळविण्यात येणार आहेत. खेळाडूंना गणवेश, भोजन ,निवास व्यवस्था मोफत केली जाते. विजेत्या संघास रोख १ लाख रु चषक व उपविजेता संघास ५१ हजार तर मालिकावीर २५ हजार रोख बक्षीस व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा संयोजक प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे, सहसंयोजक संतोष कुलकर्णी, अविनाश शेरे, कल्याण पवार, सय्यद हमिद, शेख अब्दुल (पेंटर), क्रीडांगण प्रमुख सतीश नावाडे, डी.डी. सोन्नेकर, राजेश राठोड, दिपक निवळकर, कुणाल लहाने आदी काम पाहत आहेत. पंडीतराव आरकुले, विनायक अप्पा खंडागळे, पंडीतराव वाघ, जिजाभाऊ सोळंके, दत्ता जाधव, रमेश अप्पा मसुरे, बालासाहेब नाईकवाडे, शत्रुघ्न मगर, बालासाहेब चव्हाण, जनाभाऊ मगर, श्यामराव मोगल, संतोष गात, रमेश गजमल, राजेश लोया, रतन दायमा, ओमप्रकाश तोष्णीवाल, श्रीनिवास झंवर, राजेंद्र मणियार, संपतराव शेरे, पारस काला, रामभाऊ गायकवाड, पवन घुमरे, पांडुरंग कावळे, हरिभाऊ काळे, बाबा लोखंडे, विक्रम काळे, बंडु देवधर, बप्पा मोगल, विनयाकराव रोडगे, प्रकाश जंगले लक्ष्मणराव दौड, अभय लहाने, प्रा. के. के. कदम, किशोर भांडवले, दिपक (बंडु) शिंदे, कपिल ठाकुर, संतोष रोडगे, काशिनाथ घुमरे, विष्णू काळे, अन्सीराम लहाने, गजानन शेलार, अजय काष्टे, प्रमोद गायकवाड, रमेश मसुरे, मंगेश गाडगे, सुरेश शिंदे, सलमान सिद्दीकी, झिशन सिद्दीकी, समस्त शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सहकार्य करत आहेत.‌

विराट नांदेड संघाची विजयी सलामी 

जाधव सी.सी छत्रपती संभाजीनगर दरम्यान विराट नांदेडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 194 धावा करताना संदिप पाटील खांदगावकर 48 धावा,काझी शमशुजामा 62 धावा केल्या तर जाधव छत्रपती संभाजीनगर गोलंदाजी करताना राजेश शिंदे येणे 37 धावा च्या मोबादल्यात 3 विकेट घेतल्या. तर विराट नांदेड विरुद्ध छत्रपती संभाजीनगरने प्रतिउत्तर देताना छत्रपती संभाजीनगर संघाने 19.4 षटकात 159 धावा करत सर्व खेळाडू तंबूत परतले. सामना वीर पुरस्कार काझी शमशुजामा रोख 1000 रुपये व ट्राफी देण्यात आली.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!