Sant Tukaram : …नाही तर जन्म गेला वाया; सेवावृती कार्य भगवंताचे भजनच : महेश महाराज कानेगावकर

 Sant Tukaram : …नाही तर जन्म गेला वाया; सेवावृती कार्य भगवंताचे भजनच : महेश महाराज कानेगावकर

 Sant Tukaram : ...नाही तर जन्म गेला वाया; सेवावृती कार्य भगवंताचे भजनच : महेश महाराज कानेगावकर

परभणी : सचोटी आणि सेवावृती भावनेने कोणत्याही क्षेत्रातील करीत असलेले कार्य म्हणजे भगवंताचे भजनच ठरते, असे मत माकणी येथील संताई आश्रमचे महेश महाराज कानेगावकर यांनी रविवावरी, १४ जानेवारीरोजी कीर्तनातून व्यक्त केले. रामप्रसाद घोडके व भगवानराव घोडके परिवाराच्यावतीने आयोजित कीर्तनामध्ये कानेगावकर महाराज बोलत होते. (कै)बापूराव घोडके व (कै) पंचफुलाबाई घोडके यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. या वेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ”सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, नाही तर जन्म गेला वाया ” या अभंगातून संत तुकाराम महाराज यांनी सर्वांना केलेल्या उपदेशावर कानेगावकर महारजांनी विविध दृष्टांत व उदाहरणे दाखले देत, भगवंतांचे नामस्मरणातच जीवनाचे सार्थक असल्याचे सांगितले. भगवंताने दिलेला नरदेह सत्कारणी लावण्यासाठी भगवंताचे भजन करावे, आपण ज्या ठिकाणी जे कर्तव्य करतो. ते भगवंतांच्या इच्छेप्रमाणे सद्हेतून, नि:स्वार्थी आणि समर्पित भावाने केले पाहिजे. हीच विठ्ठलाची भजन सेवा आहे, असे कानेगावकर महाराज म्हणाले.

या वेळी रामप्रसाद घोडके, भगवान घोडके, राजेंद्र घोडके, डॉ.प्रताप घोडके आदींनी संतपूजन केले. याप्रसंगी महेश महाराज कानेगावकर, रमेश महाराज, प्रसिद्ध पखवाज वादक उद्धवबापू महाराज आपेगावकर, ज्ञानेश्वर डाके महाराज, सारंगधर महाराज रवळगावकर, पखवाज वादक रामबाबा काजळे, बाळू महाराज उमरीकर, सोपानकाका बोबडे महाराज, गायनाचार्य मारोती महाराज वाघ, जयराम महाराज तांगडे, विष्णु महाराज, कालिदास महाराज आवलगावकर, भगवान महाराज डासाळकर , भूषण महाराज तळणीकर, विष्णू महाराज आनंदे, राम महाराज वाघ, मृदंगाचार्य बप्पा महाराज, राजेभाऊ महाराज खरात, मारोती महाराज दांगट, सुंदर महाराज, अनंत महाराज पावडे, राजेंद्र महाराज चोरडिया, भारत महाराज पांचाळ आदींसह मान्यवरांचे संतपूजन घोडके परिवाराच्य वतीने करण्यात आले. विविध वारकरी शिक्षण संस्थाचे बालवारकीर, भजन मंडळांनी साथसंगत केली. क्रांती संजय जाधव, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, राजेंद्र लहाने, पांडुरंग मगर, दत्तराव पावडे, अशोक काकडे, रघुनाथ बागल आदींसह श्रोत्यांची उपस्थिती होती. मोहन बोराडे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसादाने सांगता झाली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!