लेनिन स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन; सेलूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कार्यक्रम

लेनिन स्मृती शताब्दीनिमित्त अभिवादन; सेलूत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कार्यक्रम

सेलू जि.परभणी : येथील हुतात्मा स्मारक परिसरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लेनिन स्मृती शताब्दी निमित्त कॉम्रेड लेनिन यांना रविवारी आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड उद्धव पौळ होते. सुरूवातीला कॉम्रेड दत्तुसिंग ठाकूर व रामकृष्ण शेरे पाटील यांनी कॉम्रेड लेनिन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. कॉम्रेड रामेश्वर पौळ यांनी प्रास्ताविकात लेनिनच्या कार्याची आजच्या काळात किती गरज आहे, या विषयी तसेच सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती बद्दल माहिती दिली. जेष्ठ कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील यांनी रशियन राज्यक्रांती व मार्क्सवाद लेनिनवाद या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या परिस्थितीत कम्युनिस्ट पक्षच देशात पर्याय देऊ शकतो. त्यासाठी कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदांनी वैचारिकदृष्ट्या परिपक्व होऊन पक्ष व संघटना वाढीसाठी पुढाकार घेऊन काम केले पाहिजे, असे आवाहन केले. मोदी सरकार व आरएसएस विचारधारे विरोधात संघर्ष करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे प्रतिपादित केले. अध्यक्षीय भाषणात कॉम्रेड उद्धव पौळ मोदी सरकार आणि आपल्या पक्षाचे धोरण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. केशव टाकळकर यांनी आभार मानले. जनरल बॉडी बैठकीला सेलू, मानवत तालुक्यातील पक्ष सभासद उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!