सेलूचे माजी नगराध्यक्ष बोराडेंचा ‘राष्ट्रवादी’ मध्ये प्रवेश निश्चित

सेलूचे माजी नगराध्यक्ष बोराडेंचा ‘राष्ट्रवादी’ मध्ये प्रवेश निश्चित

सेलूचे माजी नगराध्यक्ष बोराडेंचा 'राष्ट्रवादी' मध्ये प्रवेश निश्चित

सेलू जि.परभणी : गेल्या २७ वर्षांपासून कॉंग्रेस, अपक्ष, भारतीय जनता पक्ष पुन्हा अपक्ष असा प्रवास करून सेलू नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणारे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. 

रविवारी सायंकाळी सात वाजता साईराज बोराडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांशी सुसंवाद झाला आहे, असे बोराडे यांनी सांगितले. राष्ट्रवादीतील एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजपासोबत सत्तेत सहभागी झाला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, सेलू तालुका अपवाद ठरला. अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू माजी आमदार विजयराव भांबळे यांनी शरदचंद्र पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सेलू तालुक्यात अजित पवार गटाची ताकद दिसून येत नव्हती. बोराडे यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाला बळ मिळणार आहे. सेलू नगरपालिकेला मोठा विकास निधी मिळू शकेल, यासाठीही बोराडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!