अयोध्या धाम प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : श्रीरामनामजपासह महाआरती, हनुमान चालिसाचे पाठ

अयोध्या धाम प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : श्रीरामनामजपासह महाआरती, हनुमान चालिसाचे पाठ

अयोध्या धाम प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा : श्रीरामनामजपासह महाआरती, हनुमान चालिसाचे पाठ

परभणी, सेलू, जिंतूरसह ठिकठिकाणी विविध कार्यक्रम

परभणी : अयोध्या धाम येथील प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त परभणी, सेलू, जिंतूरसह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सोमवारी, २२ जानेवारीरोजी पालखी मिरवणूक, शोभायात्रा, सामुदायिक महाआरती, श्रीराम नामजप, हनुमान चालीसा पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम राबिवण्यात आली आहे. शहरासह गावागावातील घरे, प्रमुख रस्ते, मंदिर परिसरात भगवे ध्वज लावण्यात आले आहे. रामभक्तांच्या वतीने लोकप्रतिनिधींसह नागरिकांना घरोघरी जाऊन अक्षता वाटप करीत प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जात आहे.
सेलू् येथील ब्राह्मणगल्लीतील प्राचीन श्रीराम मंदिर व हेमाडपंती श्री हरिकेश्वर महादेव मंदिर परिसरात सोमवारी दुपारी बारा वाजता श्रीरामपभुंची महाआरती व महाप्रसाद आहे. लोकमान्य टिळक पुतळा परिसरात प्रभु श्रीरामाची भव्य प्रतिमा उभारण्यात येणार आहे. रामभक्तांच्या वतीने सायंकाळी साडेसहा वाजता सामुदायिक महाआरती, हनुमान चालीसा पठण, रंगबिरंगी आतषबाजी आहे. समता नगरमधील श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने सकाळी पालखी मिरवणूक, नगर प्रदक्षिणा, अभिषेक, दुपारी महाआरती आहे. श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात सायंकाळी दीपोत्सव आहे. महेशनगरातील श्री साईबाबा मंदिरात सकाळी अभिषेक, श्री साई चरित्र पारायण, श्रीराम नाम जप, आरती, सायंकाळी साडे सहा वाजता महाआरती, दीपोत्सव आतषबाजी होणार आहे. आदर्शनगरातील श्रीराम मंदिरासह विविध मंदिरात कार्यक्रम आहेत. परभणी येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शनिवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम होत आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती, आतिषबाजी करण्यात येणार आहे. गंगाखेड, पूर्णा, पाथरी, मानवत, पालम, सोनपेठ शहर व तालुक्यातही रामभक्तांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जिंतूरमध्ये शोभायात्रा मिरवणूक

जिंतूर शहरात श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव समिती आणि रामभक्तांच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर ते कसबा पेठेतील प्राचीन श्रीराम मंदिरापर्यंत श्रीरामांच्या भव्य प्रतिमेची सकाळी साडेसात वाजता शोभायात्रा मिरवणूक काढण्यात येणार आहे. दादा शरीफ चौकातील श्री जागृत हनुमान मंंदिरात हनुमान चालिसाचे पाठ आहेत. शोभायात्रेमध्ये वारकरी संस्थांचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, लेझीम पथक. स्काऊट व गाईड, कारसेवक. संत महंत, लोकप्रतिनिधी, महिला, नागरिक सहभागी होणार आहेत. श्रीराम मंदिर परिसरात दोन एलईडीव्दारे अयोध्या येथील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी साडे बारा वाजता महाआरती आहे. या प्रसंगी स्वामी महेशानंद पुरी महाराज, संदीपभाई शर्मा, अमृतेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज आदींसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!