सेलूतील न्यू हायस्कूल केंद्रावर नवोदय परीक्षा सुरळीत
सेलू : येथील न्यू हायस्कूल केंद्रावर शनिवारी, २० जानेवारी रोजी नवोदय परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा केंद्रावर एकूण ९ परीक्षा हॉल होते. २०२ विद्यार्थ्यांपैकी १९१ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. ११ विद्यार्थी अनुपस्थित होते. गटशिक्षणाधिकारीउमेश राऊत यांनी परीक्षेदरम्यान केंद्रास भेट दिली. केंद्र निरीक्षक म्हणून आर.टी.अंबेकर, केंद्राध्यक्ष म्हणून धनंजय भागवत यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शरद मगर, प्रा.भाऊसाहेब निकम तर पर्यवेक्षक म्हणून प्रा.संतोष कुलकर्णी, तोटेवाड, रोंटेवाड,सोळंके,पवार,कुरेशी, बेग,शिंदे मोरे यांनी काम पाहिले.