रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा पारवे (रोडगे ),  मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑलम्पिक परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर IMO मध्ये १ ला क्रमांक प्रेरणा कास्टे,IMO मध्ये ८ वा क्रमांक प्रज्वल रोडगे, IMO मध्ये ९वा क्रमांक तेजश्री चौधरी, NSO मध्ये १२ वा क्रमांक प्रज्वल रोडगे, NSO मध्ये २९ वाद क्रमांक तेजश्री चौधरी, IMO मध्ये ४५ क्रमांक उन्नती राठी, IEO मध्ये ६३ वा क्रमांक प्रेरणा काष्टे, NSO मध्ये ६३ वा क्रमांक श्रीयश पोटदार यासोबत दुसऱ्या स्तरावर परीक्षेत गेलेले विद्यार्थी व सुवर्णपदक मिळालेले २२ विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकासोबत केला.
भूषण कासट, डॉ.नंद, श्री काष्टे  इत्यादी पालकांनी चिमुकल्या मुलांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष व घडविणाऱ्या शिक्षक वर्गांचेही कौतुक केले. अशा या सत्कारामुळे मुलांची मनोबल वाढले जाते, त्यांना प्रेरणा मिळते. पुढे चालून हे विद्यार्थी चांगल्या पदावर जावे अशी आशा व्यक्त केली. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
डॉ. संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, गुणवंत विद्यार्थी म्हणजे आमची हिऱ्याची खाण आहे. या खाणीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवंता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कोहिनूरचा हिरा’ म्हणाले. तेजश्रीचे तेज व प्रेरणांची प्रेरणा घेऊन, असे अनेक विद्यार्थी या शाळेत घडावे. विद्यार्थ्यांनी नुसती घोकमपट्टी न करता त्यांनी शिक्षणाचे ज्ञानार्जन करावे. सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!