तीन फेब्रुवारीपासून सेलूमध्ये जनुभाऊ रानडे व्याख्यानमाला

तीन फेब्रुवारीपासून सेलूमध्ये जनुभाऊ रानडे व्याख्यानमाला

देवगिरी नागरी सहकारी बँक व विवेकानंद विद्यालयाचा संयुक्त उपक्रम 

सेलू : मागील अकरा वर्षांत ,राष्ट्रीय व सामाजिक विषयाचे प्रबोधन करीत समाजाभिमुख ठरलेल्या स्व.जनुभाऊ रानडे व्याख्यान मालेचे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येत्या ३ व ४ फेब्रुवारीस व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नूतन विद्यालयाच्या रा.ब.गिल्डा सभागृहात दोन्ही दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यानमाला आहे. ३ फेब्रुवारीला पहिले पुष्प “राममंदिर ते रामराज्य ” या विषयावर भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर गुंफणार असून अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे राहणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी ” शिवरायाचा आठवावा प्रताप ” या विषयावर शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक सौरभ करडे विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईचे कार्यवाह डाॅ.हेमंत वैद्य असणार आहेत. व्याख्यानमालेला श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन, देवगिरी नागरी सहकारी बँक, विवेकानंद प्राथमिक विद्यालय व संयोजन समितीने केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!