Sports : रोडगे प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात

Sports : रोडगे प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात

सेलूतील श्रीराम प्रतिष्ठान व डॉ.संजय रोडगे मित्र मंडळाचा उपक्रम

सेलू जि.परभणी : श्रीराम प्रतिष्ठान व डॉ.संजय रोडगे मित्र मंडळातर्फे आयोजित रोडगे प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते बुधवारी, २४ जानेवारी रोजी उत्साहात झाले.

या प्रसंगी याप्रसंगी गटकळ करिअर ॲकडमीचे रामेश्वर गटकळ, अशोक अंभोरे, डॉ.ऋतुराज साडेगावकर, जयसिंग शेळके, रवींद्र डासाळकर, प्रसाद खारकर, माऊली ताठे, कपिल फुलारी, संदीप टाक, दीपक रोडगे, प्रभाकर गजमल अन्वर खान पठाण, प्रदीप रोडगे, गणेश रोडगे, गुलाबराव रोडगे, प्रकाश बप्पा गजमल, संजय गटकळ, बद्रीभाऊ ताठे, अशोक चाळके आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती.

२४ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान स्पर्धा चालणार आहे. एकूण दहा संघ साखळी पद्धतीने सामने खेळणार आहेत. डॉ.संजयदादा रोडगे यांनी आयोजित रोडगे प्रीमियर लीगच्या माध्यमातून सेलू व परिसरातील खेळाडूंना एक भव्य असे प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो असे मनोगत श्री गटकळ यांनी व्यक्त केले. खेळाडूंनी देखील खेळाडू वृत्तीच्या भावनेतून आपला उत्कृष्ट खेळ सादर करावा व राज्यस्तरावर जास्तीत जास्त खेळाडू नेतृत्व कसे करतील याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे मनोगत अशोक अंभोरे यांनी व्यक्त केले.‌ दिवसांमध्ये असंख्य युवकांचे लक्ष हे सोशल मीडियाच्या माध्यमातून भरकटत आहे. जर आपल्याला आपले मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य सांभाळायचे असेल तर मैदानी खेळ खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे. सेलू व परिसरातील खेळाडूंना एक उच्च दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले असून खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवून या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठाकर व दिगंबर टाके यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल ठाकूर यांनी केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!