मुस्लिम समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी : महाराष्ट्र राज्यात जुन्या दस्तावेजमध्ये मुस्लीम समाजातील बहुतांश नागरिकांनी कुणबी नोंद केलेली आहे. त्याद्वारे मुस्लिम समाजातील कुणबी शोध मोहीम राबवून मुस्लिम समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे , अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. सेलू पालिकेचे माजी नगरसेवक रहीमखान खैरुल्लाखान यांच्या नेतृत्वात बुधवारी,२४ जानेवारीरोजी तहसीलदार दिनेश झांपले यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. शेख इस्माईल, खयुम कादरी, सय्यद कलीम, शेख सलमान, विकास धापसे, शेख इस्माईल, शेख इमरान, सय्यद शोएब, झबी खान, अब्दुल हफिझ, असीम खान, मिर्झा अफसर बेग, नईम खान, अलीम खान, अब्दुल मोईज, मझहर खान, असद बेलदार आदींसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.