मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : मराठी भाषा संवर्धन पंधराड्यानिमित्त भित्तीपत्रकाचे प्रकाशन; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : मराठी भाषा संवर्धन पंधराड्यानिमित्त भित्तीपत्रकाचे प्रकाशन; सेलूतील नूतन विद्यालयात कार्यक्रम

सेलू : मायबोली मराठी ही अभिजात असून समृद्ध भाषा आहे. संत साहित्य, महानुभाव साहित्य आणि कादंबरी, कथा, कवितांची उज्वल परंपरा मराठी भाषेला आहे. असे प्रतिपादन कवी तथा मराठी विषय शिक्षक सुरेश हिवाळे यांनी केले. नूतन विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व मतदार जागृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरूवारी २५ जानेवारी रोजी सुरेश हिवाळे बोलत होते. या वेळी भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील होते.  व्यासपीठावर पर्यवेक्षक किरण देशपांडे, देविदास सोन्नेकर , अशोक लिंबेकर, लक्ष्मण वांगे, डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सुरेश हिवाळे म्हणाले की, ‘ विद्यार्थ्यांनी त्यांना आवडतील ते कथा, कविता संग्रह, कांदंबरीचे वाचन केले पाहिजे. वाचनातूनच व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. कार्यक्रमात मराठी विषयाचे ज्येष्ठ शिक्षक लक्ष्मण वांगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेतील विद्यार्थी प्रणव घोडके, प्रथमेश मुसळे, प्रदीप पवार, सर्वेश मानकर, निकुज बिडवे, सिध्देश्वर इंगळे, प्रशांत इंगळे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मतदार दिनानिमित्त शिक्षक, विद्यार्थ्यांना मतदान संकल्प प्रतिज्ञा देण्यात आली. सच्चिदानंद डाखोरे यांनी ‘ लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर केले. सूत्रसंचालन प्रभू भुसारे यांनी केले. तर आभार गोपाळ आम्ले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शैलजा कवुटकर, वर्षा कदम, संध्या फुलपगार, केशव डहाळे, अरूण रामपुरकर यांनी पुढाकार घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!