मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन; सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन; सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम 

भारतीय संस्कृती दर्शनच्या सजीव देखाव्यांनी उपस्थितांचे वेधले लक्ष

सेलू जि.परभणी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणार्‍या सजीव देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे गुरुजी, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, अजीज खान पठाण, पालक शिक्षक संघांच्या उपाध्यक्ष आरती पांडव, वैजनाथ मोळे, संतोष पाटील, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, कालिदास दुरूक्कर गुरुजी, सौ.देशपांडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विविधतेने नटलेल्या भारतातील विविध राज्यांची संस्कृती, जीवनमान, वेशभूषा आदींबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामीळनाडू, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, गुजरात, पंजाब, आसाम, राष्ट्रीय एकता आदी सजीव देखावे विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. कृष्णा ढेकळे, रितेश कांबळे, अनुज वानरे, सिद्धी शिंदे, सृष्टी कटारे, मानसी कुलकर्णी, सानिका गजलकर, वेदिका बिडवे, सोहम होलिया, गजानन ढवळे, तमन्ना डिका, चिराग कुकरेजा, अभिषेक वटाणे, गौरी कुलथे, रितेश लहाने, तन्वी भोगरे, प्राची शिंदे, अक्षरा शिंदे, सई ताठे, रागिणी राठोड, उन्नती राऊत, आफिया फिरोज, अंजली दौंड, पलश भुक्तर, प्रेम वीर, गीता खेडकर, अक्षरा क्षीरसागर, प्रियांका चव्हाण, श्रेया कुलथे, नमिता आचलिया, संस्कृती ढेकळे, क्षितिजा कुंभकर्ण, श्रुती गेरकर, गायत्री गायके, कार्तिकी गोरे, उत्तरा लोंढे, श्रेयशी मोरे, प्रजवी भागडे, श्रद्धा नवले, पूनम लिंगायत, श्रेया मोरे, वेदिका बिडवे, श्रद्धा ताठे, श्रेया भुमरे, आराध्या साखरे, साक्षी इघवे, श्रावणी खुळे, आर्या घाडगे, दर्शना जोशी, वीरा डीका, शाश्वत संघई, दक्ष कांबळे,साहिल कळसकर, यश लिपणे, हरिओम दुगाणे, शिवशंकर नवले, कार्तिक लिंगे, साई सोळंके, तीर्थेश संगई, सज्जन ठाकूर, ऋषीकेश गायकवाड, सूर्या पठाडे, सुंदर जीवने, रणवीर राठोड, रुद्र खरात, गजानन शेरे, यश उंडे, सार्थक पवार, स्वराज सरकटे, गौरव भिसे, कार्तिक ढाले आदी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.संयोजक अशोक लिंबेकर, काशीनाथ पल्लेवाड, परसराम कपाटे, सच्चिदानंद डाखोरे, काष्टे, संजय भूमकर, शैलजा कवुटकर, अनुजा सुभेदार, लाडाने, आर.डी.कटारे आदींनी पुढाकार घेतला.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन; सेलूतील नूतन विद्यालयाचा उपक्रम 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!