सेलूतील रेल्वे ओलांडी पुलाला रवळगावकडे वळण रस्ता द्या
रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील ग्रामपंचायतींंची ठरावाव्दारे मागणी
सेलू जि.परभणी : सेलू-पाथरी रस्त्यावरील रेल्वे गेटवरील होत असलेल्या ओलांडी पुलाला रवळगावकडे जाणाऱ्या रस्त्याला वळण रस्ता देण्याची मागणी आमदार मेघना बोर्डीकर व उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. या रस्त्याने ग्रामीण भागातून बाजारपेठेत मालाची वाहतूक, शाळा, महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आष्टी कडे जाणाऱ्या बसेस, गर्भवती महिला, आजारी व्यक्तींना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी व इतरही आवश्यक बाबींना रेल्वे गेट लागल्यानंतर थांबावे लागत आहे. तालुक्यातील रवळगाव जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व ग्रामपंचायतीनी ओलांडी पुलाला रवळगावकडे वळण रस्ता देण्यासाठी संबंधित विभागाला ठराव दिले आहेत.यावेळी बाजार समितीचे संचालक डॉ. संजय रोडगे, ॲड. दत्ताराव कदम, माऊली ताठे, सरपंच दिपक रोडगे, तुकाराम लहाने, अशोक लिपणे, दादाभाऊ बोंबले, सुभाष गायकवाड, रामेश्र्वर गटकळ, कैलास पवार, गणेश रोडगे, गुलाब रोडगे, प्रदीप रोडगे, सुनील रोडग आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.