सकल मराठा समाज बांधवांचा सेलूमध्ये जल्लोष
परभणी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाले. याचा आनंदोत्सव सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करून साजरा करण्यात आला. सेलू येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या तालावर मराठा समाजातील पुढार्यांनी ठेका धरला. एकमेकाला पेढे भरुन आनंदोत्सव साजरा केला. या वेळी सकल मराठा समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.