सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण बागल यांची फेरनिवड; सचिवपदी शेख मोहसिन अहमद
कार्याध्यक्ष संजय मुंढे, सहसचिव पूनमचंद खोना, उपाध्यक्षपदी अबरार बेग
सेलू जि.परभणी : अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषद मुंबई संलग्न सेलू तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक २७ जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता शासकिय विश्राम गृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सेलू शहर तालुक्यातील तसेच डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते. या वेळी सेलू तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण बागल यांची फेरनिवड करण्यात आली, तर सचिवपदी शेख मोहसिन अहमद, कार्याध्यक्ष म्हणून संजय मुंढे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रास्ताविकात शेख मोहसिन अहमद यांनी मागील वर्षभरात संघटनेच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम, संघाचे मेळावे, समाजकार्य कार्याची माहिती विषद केली. नवीन कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष अबरार बेग, कोषाध्यक्ष दिलिप मोरे, सहसचिव पुनमचंद खोना, सल्लागार कांचन कोरडे, मोहमद ईलियास, संतोष गरड, डी. व्ही. मुळे, सदस्य निसार पठाण, अझगर पठाण, रामेश्वर बहिरट, रेवणअप्पा साळेगावकर, डाॅ.विलास मोरे, नीळकंठ पवार, राहूल खपले, निशिकांत रोडगे, महादेव गिरी, रोहित झोल, राधाकिशन कदम. निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून कांचन कोरडे यांनी काम पाहिले. आभार निसार पठाण यांनी मानले.